Lemon Tea saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Patient: सावधान! डायबिटीजच्या रुग्णांनी लेमन टीसोबत चुकूनही 'या' गोष्टीचे सेवन करू नका, अन्यथा...

lemon tea: लेमन टी हे आरोग्यदायी पेय आहे. हे केवळ ताजेपणा आणि चवीने परिपूर्ण नाही तर पचनासाठी सुद्धा उत्तम आहे.

Saam Tv

लेमन टी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, लेमन टीमध्ये काही खाद्यपदार्थ मिसळणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

हे खरं आहे

लेमन टी काही खाद्यपदार्थांसोबत पिऊ नये. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि आरोग्य बिघडू लागते. या लेखात तुम्ही अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेऊ शकता जे लेमन टीसोबत खाणे टाळले पाहिजेत.

दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही किंवा चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन लेमन टीसोबत करू नये. याचे कारण म्हणजे लिंबूमध्ये असलेले ऍसिड दुधामध्ये आढळणाऱ्या प्रथिनांशी प्रतिक्रिया देते. ज्यामुळे दुधाची रचना बदलते. यामुळे पोटात पेटके येणे, गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

रताळे

रताळ्याचे सेवन कधीच लेमन टीसोबत करू नये. रताळ्यांमध्ये कार्बोहाइटड्रेट्स आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. तुम्ही जर आम्ल असलेले पदार्थ आणि रताळ्याचे सेवन केले तर पचनकार्य सुरळीत पार पडत नाही. या मिश्रणामुळे पोटात सूज आणि गॅस होऊ शकतो.

मसालेदार पदार्थांचे सेवन

मसालेदार पदार्थ जसे की समोसे, पकोडे, वडा पाव, मिरची किंवा मसालेदार करी लिंबू चहासोबत खाऊ नयेत. हे लेमन टीमध्ये मिसळल्यास आम्लपित्त, अपचन आणि पोटात जळजळ होऊ शकते.

फ्रिजमधील अन्न

फ्रिजमध्ये ठेवलेले आणि थंड असलेले अन्न लेमन टीसोबत घेऊ नये. गरम चहासोबत थंड पदार्थ खाल्ल्यास त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. थंड अन्न पोटात थंडपणाची भावना देते, ज्यामुळे पचन मंदावते आणि गॅस सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न ताजे अन्न खाणे चांगले.

गोड पदार्थ

ज्या पदार्थात साखर असते ते पदार्थ लेमन टीसोबत खाणे टाळा. जसे की, केक, बिस्किटे, नानकेट, मिठाई यांसारख्या गोड पदार्थांचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही ते खाणे टाळावे.

Edited By: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT