Warning signs of kidney failure  saam tv
लाईफस्टाईल

Kidney Failure Symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत, वेळीच ओळखून उपचार करा

Warning signs of kidney failure : किडनी निकामी झाल्यास शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. सध्या किडनी फेल होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, किडनी काम करणे थांबवण्याआधी शरीर काही महत्त्वाचे इशारे देतं.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण किडनीचं आरोग्य जपणं महत्त्वाचं आहे. किडनी निकामी होणं ही एक गंभीर स्थिती आहे. ही स्थिती तेव्हा उद्धभवते ज्यावेळी किडनी योग्यरित्या काम करण्याची क्षमता गमावते. रक्तातील घाण काढून टाकण्याव्यतिरिक्त, पाणी फिल्टर करणं, इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करणं अशी करणं अशी काम देखील किडनीमार्फत केली जातात.

किडनी निकामी होणं

एक्यूट किडनी फेलियरमुळे आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. किडनी निकामी होण्याची काही प्रकरणं आजकाल समोर येताना दिसतात. मात्र किडनी निकामी होण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं. ही लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

एनिमिया

किडनी निकामी होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे अधिक प्रमाणात थकवा येणं. यामध्ये किडनी रक्तातील टॉक्सिन पदार्थ काढून टाकण्यास अपयशी ठरतात. त्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो. परिणामी व्यक्तीला सतत थकवा, अशक्तपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.

रात्री सतत लघवी होणं

अनेकांना रात्री उठून लघवी करण्याची सवय असते. पण जर तुम्हाला रात्री वारंवार लघवी करण्याची गरज वाटत असेल तर हे किडनीच्या समस्येचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी किडनी योग्यप्रकारे काम करत नाही तेव्हा शरीरातील द्रव पदार्थ व्यवस्थित फिल्टर होत नाहीत. परिणामी तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागू शकतं.

रात्री भरपूर तहान लागणं

किडनी फेल झाल्यास शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडू शकतं. ज्यामुळे रात्री खूप तहान लागण्याची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला रात्री वारंवार पाणी पिण्याची सवय असेल हे किडनीच्या समस्येचं लक्षण असू शकतं.

लघवीतून रक्तस्राव होणं

लघवीमध्ये रक्त दिसणं हे रक्त किडनीचं इन्फेक्शन, स्टोन किंवा इतर गंभीर समस्यांचं लक्षण असू शकतं. लघवीत रक्त दिसलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही एक गंभीर स्थिती असू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT