Healthy kitchen habits saam tv
लाईफस्टाईल

Cholesterol myths: किचनमधील 'या' चुका वाढवतायत तुमचं कोलेस्ट्रॉल; मनात असलेले गैरमसज आजच काढून टाका

Healthy kitchen habits: आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) सारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. हे केवळ चुकीच्या जीवनशैलीमुळेच नाही, तर आपल्या स्वयंपाकघरात (Kitchen) नकळत होणाऱ्या काही चुकांमुळेही होते.

Surabhi Jayashree Jagdish

आरोग्य आणि आहाराविषयी जगभरात अनेक तज्ज्ञ सल्ला देत असतात. पण कोलेस्ट्रॉल हा त्यातील सर्वाधिक गैरसमज होणारा विषय मानला जातो. अनेकांना वाटतं की कोलेस्ट्रॉल म्हणजे फक्त हृदयरोगाचं कारण, पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. तज्ज्ञांनी कोलेस्ट्रॉलबद्दलचे काही गैरसमज दूर केले आणि योग्य आहार आणि योग्य स्वयंपाकातील तेलाची निवड करून हृदयाचं आरोग्य कसं जपता येईल हे स्पष्ट केलं.

कोलेस्ट्रॉल खरं तर काय आहे?

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, “सगळंच कोलेस्ट्रॉल वाईट नाही, उलट त्याचं शरीरात महत्त्वाचं काम आहे. त्याचे दोन प्रकार आहेत, LDL (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) ज्याला ‘वाईट कोलेस्ट्रॉल’ म्हटलं जातं आणि HDL (हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन) ज्याला ‘चांगलं कोलेस्ट्रॉल’ म्हटलं जातं. LDL धमन्यांमध्ये साचल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो. तर HDL रक्तातून LDL काढून टाकतं आणि हृदयाचं रक्षण करतं.”

आहारतज्ज्ञांनी सांगितलं की, यात स्वयंपाकाचं तेल मोठी भूमिका बजावतं. MUFA म्हणजेच मोनोअनसॅच्युरेटेड आणि PUFA (पॉलीअनसॅच्युरेटेड) फॅटी ऍसिड्सचा योग्य समतोल असलेले तेल LDL कमी करण्यास आणि HDL वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे योग्य तेलाची निवड महत्त्वाची आहे.

कोलेस्ट्रॉलबाबत कोणते गैरसमज आहेत?

गैरसमज - मी तरुण आहे, मला कोलेस्ट्रॉलची काळजी नाही.

अनेकांना वाटतं कोलेस्ट्रॉल फक्त ४० वर्षांनंतरचं प्रॉब्लेम आहे. पण आजच्या स्क्रीन-केंद्रित जीवनशैली उशिराच्या जेवणाच्या सवयी आणि जंक फूडमुळे कोलेस्ट्रॉलचा त्रास वीसाव्या वर्षातही होऊ शकतो. पण चांगली गोष्ट म्हणजे हृदयाचं आरोग्य जपायला सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर होत नाही.

योग्य तेलाची निवड, नियमित व्यायाम, आणि MUFA-PUFA असलेल्या मिश्रित तेलांचा वापर केल्याने दीर्घकाळ हृदय निरोगी राहू शकतं.

गैरसमज - “माझ्या कुटुंबात कोलेस्ट्रॉलचा इतिहास नाही, त्यामुळे मला धोका नाही.”

कुटुंबाचा इतिहास महत्त्वाचा असतो, पण दैनंदिन जीवनशैलीचं योगदान जास्त असतं. जास्त सॅच्युरेटेड फॅट्स किंवा ट्रान्स फॅट्स असलेलं तेल LDL वाढवतं आणि HDL कमी करतं. त्यामुळे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन A, D असलेली मिश्रित तेल हृदयासाठी उत्तम पर्याय ठरतात.

गैरसमज - “मी बारीक आहे, त्यामुळे मला कोलेस्ट्रॉलची काळजी नाही.”

शरीराच्या बाहेरून बारीक दिसणं आणि आतून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणं हे वेगळं आहे. “बारीक असूनही LDL वाढलेलं असू शकतं. म्हणूनच संतुलित आहार, आरोग्यदायी फॅट्सचा वापर आणि वेळोवेळी कोलेस्ट्रॉल तपासणं आवश्यक आहे. अन्नाचा आनंद घेणं चुकीचं नाही, पण तो मर्यादित आणि विचारपूर्वक घ्यायला हवा.”

गैरसमज - “सगळी तेल हानिकारक आहेत आणि कोलेस्ट्रॉल वाढवतात.”

खरं म्हणजे तेलात कोणते फॅट्स आहेत हे महत्त्वाचं आहे. फॅट्स ही शरीरासाठी आवश्यक पोषकद्रव्यं आहेत. ते शरीराला ऊर्जा देतात. यामधील ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ऍसिड्स शरीराला बाहेरून मिळवावे लागतात कारण शरीर स्वतः ते तयार करू शकत नाही.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: न्यायालयाच्या नियमांचे पालन करा, जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन

Maratha Reservation: खाऊगल्ली का बंद होती? व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यावरुन मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

John Cena: जॉन सीना WWE मधून घेणार निवृत्ती? कधी खेळणार शेवटचा सामना?

Horoscope Tuesday: या राशीने वाद टाळा, काही राशींना प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maratha Reservation: चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर मार्ग काढू; आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT