Ovarian cancer misconceptions saam tv
लाईफस्टाईल

Ovarian cancer: ओव्हरियन कॅन्सरचे हे गैरसमज महिलांसाठी ठरू शकतात घातक; पाहा स्त्रीरोगतज्ज्ञ काय सांगतात?

Ovarian cancer misconceptions: अंडाशयाचा कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा गंभीर आजार आहे. मात्र याविषयी अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर या शब्दाबाबत अनेक गैरसमज आहेत. इतकंच नाही तर ओव्हरियन कॅन्सरबाबत अनेक गैरसमज आजही समाजात आहेत. अंडाशयातील गाठी किंवा इतर महिलांच्या समस्यांमुळे ओव्हरियन कॅन्सरबाबत संभ्रम निर्माण होतो. परंतु या गैरसमजांमागची खरी कारणं आणि वास्तव ओळखणं आता गरजेचं आहे. ओव्हरियन कॅन्सरविषयी महिलांच्या मनात कोणते चुकीचे समज आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमधील वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. मधुलिका सिंग यांनी सांगितलं की, ओव्हरियन कॅन्सर म्हणजे महिलांच्या अंडाशयातील पेशींमध्ये होणारी अनियंत्रित वाढ. हा कॅन्सर बहुतेक वेळा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठोस लक्षणं न देता वाढत जातोय त्यामुळे अनेकदा त्याचं निदान उशीरा होतं. या कॅन्सरचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसले तरी वाढतं वय, कौटुंबिक वैद्यकीय इतिहास आणि BRCA1 व BRCA2 सारखे अनुवांशिक बदल यामुळे धोका वाढू शकतो.

ओव्हेरियन कॅन्सरबाबत लोकांच्या मनात असलेले गैरसमज

गैरसमज- ओव्हरियन कॅन्सर फक्त ५० वर्षांवरील महिलांनाच होतो

सत्यता: अनेकांचा असा समज आहे की, ओव्हरियन कॅन्सर केवळ वयोवृद्ध महिलांनाच होतो. मात्र हा कॅन्सर ५० वर्षांनंतर अधिक प्रमाणात आढळतो. मात्र तो कोणत्याही वयात होऊ शकतो. ज्या महिलांच्या कुटुंबात ओव्हरियन कॅन्सरचा इतिहास असेल किंवा ज्यांना अनुवांशिक धोका आहे त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

गैरसमज: फक्त कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनाच ओव्हरियन कॅन्सर होतो

सत्यता: कौटुंबिक इतिहासामुळे धोका वाढतो हे जरी खरं असलं, तरी ओव्हरियन कॅन्सर झालेल्या अनेक महिलांच्या कुटुंबात याआधी कधीही कॅन्सरचा इतिहास नसतो. BRCA1 आणि BRCA2 सारखे अनुवांशिक बदल देखील या आजाराला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे कोणताही इतिहास नसला तरी सर्व महिलांनी सतर्क राहणं, नियमित तपासण्या करून घेणं आणि लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

गैरसमज: ओव्हरियन कॅन्सर म्हणजे मृत्यू अटळ

सत्यता: वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे ओव्हरियन कॅन्सरचं निदान आणि उपचार अधिक प्रभावी झालंय. वेळीच आजार ओळखला गेला आणि योग्य उपचार सुरू झाले तर महिलांचं जीवनमान सुधारू शकतं आणि आयुष्य वाढू शकतं. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.

गैरसमज: पॅप स्मीअर चाचणीमुळे ओव्हरियन कॅन्सर ओळखता येतो

सत्यता: अनेक महिलांना वाटतं की, पॅप स्मीअर चाचणीमुळे ओव्हरियन कॅन्सरचीही तपासणी होते. मात्र, पॅप स्मीअर चाचणी ही गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी असते, ओव्हरियन कॅन्सरसाठी नाही. ज्या महिलांमध्ये ओव्हरियन कॅन्सरचा धोका अधिक आहे किंवा ज्यांना पोट फुगणं, ओटीपोटात दुखणं, खाण्याच्या सवयींमध्ये बदल, लैंगिक संबंधांदरम्यान वेदना, पाठदुखी, मासिक पाळीत बदल किंवा सतत थकवा जाणवतो, अशा महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड आणि CA-125 ब्लड टेस्टचा सल्ला दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

Train Accident: भीषण रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली; ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका, मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

SCROLL FOR NEXT