हार्ट अटॅक म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं तो छातीत अचानक होणाऱ्या तीव्र वेदना, घाम, धडधड... पण प्रत्येक हार्ट अटॅक असा आपल्या कल्पनेप्रमाणे असतो असं नाही. काही वेळा हार्ट अटॅक अगदी 'शांतपणे' येतो. यालाच साइलेंट हार्ट अटॅक असं म्हटलं जातं.
या प्रकारात हार्ट अटॅकची ठराविक लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचारही मिळत नाही. अनेकदा ही लक्षणं फार सौम्य स्वरूपात असतात. यामध्ये रूग्णाला थकवा, थोडंसं छातीत दडपणा किंवा फक्त पोट बिघडल्यासारखं वाटण्याची शक्यता असते. महिलांमध्ये साइलेंट हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण अधिक असू शकतं. महिलांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं काय असतात ते पाहूयात.
रोजचं काम करतानाही फारच थकल्यासारखं वाटणं, आणि विश्रांतीनंतरही काही फरक न पडणं हे लक्षण धोक्याचं आहे. हृदय नीट रक्त पंप करू शकत नसेल, तर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे अशा प्रकारचा थकवा जाणवतो.
साइलेंट हार्ट अटॅकमध्ये तीव्र वेदना नसतात. मात्र यामध्ये छातीत जडपणा, थोडंशी जळजळ किंवा काही क्षणांचा हलका त्रास जाणवू शकतो. ही लक्षणं मधूनमधून येतात आणि निघून जातात. त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
थोडीशी चढ-उतार झाल्यावर किंवा अगदी शांत बसलं असतानाही दम लागतोय का? हृदय जर रक्त नीट पंप करू शकत नसेल, तर शरीराच्या गरजेनुसार ऑक्सिजन पोहोचत नाही आणि यामुळे दम लागण्यासारखं वाटतं.
जेवण न करता पोटात जडपणा वाटणं, मळमळ, उलटी सारखं वाटणं ही लक्षणं केवळ अपचन नाही, तर कधी कधी हृदयाशी संबंधित असू शकतात. पोटाशी संबंधित वाटणारी ही लक्षणं महिलांमध्ये अधिक सामान्यपणे दिसतात आणि त्यामुळे अचूक निदान होत नाही.
घाम येणं हे सामान्य आहे, पण काही वेळा व्यायाम न करता, शांत बसलेलं असतानाही अचानक थंड आणि चिकट घाम यायला लागतो. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर तो हार्ट अटॅकचं संकेत असू शकतो. हा शरीराचा नैसर्गिक 'अलार्म' असतो.
अनेकांना वाटतं हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत वेदना होतात. मात्र साइलेंट अटॅकमध्ये वेदना या जबड्यात, गळ्यात, पाठीवर किंवा हातात होऊ शकतात. कधी कधी या वेदना एकाच ठिकाणी नसून त्या शरीरातील इतर भागांमध्येही होतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.