Oral Health saam tv
लाईफस्टाईल

Oral Health: तोंडाच्या कॅन्सरचा धोका कोणाला? 'या' व्यक्तींनी नियमित करावी तपासणी; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मौखिक स्वच्छतेची काळजी घेणे, तोंड आणि जीभ नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. मुखामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल दिसले किंवा खाणं गिळताना त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या देशात तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे वाढते सेवन. आपल्या देश तंबाखूचा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक आहे. यामुळे मौखिक कर्करुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू, गुटखा, सिगारेट, किंवा खैनी सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

मौखिक कर्करोगाची (ओरल कॅन्सर) सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी तुमच्या तोंडांत चार बोट घातली तर ते व्यवस्थित उघडत आहे का, हे तपासा. तसे होत नसेल तर वेळ न दवडता डॉक्टरांशी संपर्क साधा. मौखिक कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपानाची वाईट सवय सोडणे आवश्यक आहे.

डॉ. विजय सुतार (वैद्यकीय प्रशासक, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) सांगतात की, तोंडात पांढरे-लालसर पुरळ किंवा फोड, तोंड उघडण्यात अडचण,जीभ बाहेर काढतांना त्रास, आवाजात झालेला बदल यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या. तोंडाची स्वच्छता आणि दातांची काळजी नियमितपणे घेतली नाही तर हिरड्यांना सूज, जळजळ आणि इतर संसर्ग होऊ शकतात. या दीर्घकालीन संसर्गामुळे त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान होऊन कर्करोग होऊ शकतो. मौखिक स्वच्छतेसाठी दिवसातून दोन वेळा दात घासणं, फ्लॉसिंग करणं, टूथब्रश वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे.

चांगल्या मौखिक आरोग्यासाठी सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबर नियमित व्‍यायाम करणे तसेच ॲन्‍टीऑक्‍सिडंट, प्रोटीन, फायबरर्सचा समावेश असलेला पुरक आहार घेणे गरजेचे आहे.

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखल्यास व वेळीच निदान झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. यासाठी तुमच्या तोंडात होणाऱ्या बदलनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. ठराविक कालावधीनंतर तोंडाची व दातांची तपासणी करत राहायला हवी असेही डॉ सुतार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : कुलदीप यादवला प्लेईंग ११ मध्ये संधी का दिली नाही? शुभमन गिल स्पष्टच म्हणाला...

West Bengal : पगार न मिळाल्याने डिलिव्हरी बॉयने LPG गॅस सिलेंडर उघडला! कर्मचाऱ्यांचं अनोखं आंदोलन | VIDEO

GST Relief: मध्यमवर्गीयांना दिलासा! पोरांच्या वह्या, तेल... काय काय स्वस्त होणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर

Aloe Vera For Skin: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा कोरफड, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स होतील कमी

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरेंनी वेट अँड वॉचचा सल्ला दिला

SCROLL FOR NEXT