Lung Cancer saam tv
लाईफस्टाईल

Lung Cancer : फुफ्फुसांच्या कॅन्सरची शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं; 99 टक्के लोकं करतात इग्नोर

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ओळखल्यास आणि त्यावर लवकर उपचार केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. यासाठी पहिल्यांदा फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं ओळखली पाहिजेत.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर कोणताही असो त्यावर वेळीच उपचार केले तर तो बरा होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेनशनुसार, फुफ्फुसाचा कॅन्सर पहिल्या लक्षात आला तर त्यावर उपचार करणं सोपं होतं. फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ओळखल्यास आणि त्यावर लवकर उपचार केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. यासाठी पहिल्यांदा फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं ओळखली पाहिजेत. ही लक्षणं काय असतात ते जाणून घेऊया.

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या मते, 2022 मध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुमारे 2.4 दशलक्ष नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी बहुतेक अति धूम्रपानामुळे होतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

फुफ्फुसांच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं

सततचा खोकला फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक सततचा खोकला. हा खोकला बरा होत नाही. जर तुम्हाला अनेक आठवडे खोकला असेल तर तुम्ही स्वतःची तपासणी करून घ्यावी.

श्वास घेण्यास त्रास होणं

फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे श्वासोच्छवासाच्या नळ्यांमध्ये समस्या उद्भवू शकतात. यामुळे फुफ्फुसाच्या कार्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. अशावेळी श्वास घेण्यास त्रास होतो. कोणत्याही कारणाशिवाय श्वासोच्छवासाची समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

अचानक वजन घटणं

आहारात किंवा व्यायामात बदल न करता अचानक वजन कमी झालं तर ते फुफ्फुसाच्या कॅन्सरसह विविध प्रकारच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. कॅन्सरच्या पेशी शरीरातील उर्जा आणि पोषक तत्वांचा वापर करतात, ज्यामुळे वजन कमी होते.

आवाजात बदल होणं

स्वरयंत्र नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूंवर कॅन्सरचा परिणाम होत असतो. त्यामुळे कर्कशपणा किंवा तुमच्या आवाजात सतत बदल होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आवाजात कोणतेही दिसल्यास वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT