Kidney Damage Symptoms at Night saam tv
लाईफस्टाईल

Kidney failure warning signs: किडनी फेल झाल्यानंतर फक्त रात्रीच्या वेळी दिसतात 'हे' बदल; 90% लोकं करतात इग्नोर

Kidney Damage Symptoms at Night: किडनी हा त्यातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ आणि अनावश्यक पाणी बाहेर काढण्याचे काम करतो. पण जेव्हा किडनी व्यवस्थित काम करणे थांबवते, तेव्हा काही लक्षणं दिसू लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते.

  • वारंवार लघवी होणे किडनी समस्येचे लक्षण आहे.

  • पाय आणि घोट्यांना सूज येणे किडनीच्या नुकसानाचे लक्षण आहे.

किडनी आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते आणि शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकते. त्याचप्रमाणे पाणी तसंच इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखते. अशा परिस्थितीत किडनी नीट काम करत नसेल किंवा ती खराब झाली, तर त्याचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावर दिसू लागतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, किडनी खराब झाल्यानंतर खास करून रात्रीच्या वेळी काही लक्षणं दिसून येतात. या लक्षणांकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते.

वारंवार लघवी लागणं

किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास रात्री वारंवार लघवी लागण्याचा त्रास होतो. वारंवार लघवी होणं म्हणजे किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याचे संकेत असू शकतात. सामान्यतः निरोगी किडनी लघवीवर नियंत्रण ठेवते, पण किडनीला हानी पोहोचली की लघवीची वारंवारता वाढते.

पाय आणि घोट्यांना सूज येणं

किडनी खराब झाल्यास शरीरातील सोडियमचा समतोल बिघडतो. त्यामुळे शरीरात पाणी साठू लागतं. यावेळी आणि पाय, घोटे तसंच हात सुजतात. दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री विश्रांती घेताना ही सूज जास्त जाणवते.

त्वचेवर खाज आणि जळजळ होणं

किडनीचं काम शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकणं आहे. पण त्यात अडथळा निर्माण झाल्यास ही घाण त्वचेवर साचते. त्यामुळे विशेषतः रात्री खाज येणे व त्वचेवर जळजळ जाणवते.

निद्रानाश व थकवा

किडनी खराब झाल्यास शरीरात विषारी द्रव्यं वाढू लागतात. यामुळे निद्रानाशाचा त्रास उद्भवतो. व्यक्तीला वारंवार झोप मोडणं, अस्वस्थता किंवा पूर्णपणे झोप न लागणं अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्यासोबत दिवसभर थकवा जाणवतो आणि शरीरात ऊर्जा कमी पडते.

श्वास घेण्यास त्रास होणं

काही लोकांना रात्री आडवं झोपल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो. हे किडनी निकामी होण्याचे गंभीर लक्षण असू शकतं. कारण अशा वेळी फुफ्फुसांमध्ये द्रव साचतो. अशी समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किडनीचे मुख्य कार्य कोणते?

रक्त शुद्ध करून घातक द्रव्ये बाहेर टाकणे.

किडनी खराब झाल्यास रात्री कोणती लक्षणे दिसतात?

वारंवार लघवी, सूज, खाज, थकवा आणि श्वासाचा त्रास.

पायांना सूज येण्यामागील कारण काय?

किडनीच्या अपयशामुळे शरीरात पाणी साचते.

त्वचेवर खाज येण्याचे कारण काय?

शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे खाज येते.

किडनी अपयशामुळे श्वास घेण्यास त्रास का होतो?

फुफ्फुसांमध्ये द्रव साचल्यामुळे श्वासाचा त्रास होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar: 'गुटखा तोंडात दाबून...' पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: परभणीच्या गंगाखेड तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा

Skin Care Tips: महिलांनो, रात्री झोपण्यापूर्वी ही चूक तर करत नाही ना? अन्यथा...

Loni Police : पोलिसाकडून दुकानदाराला मारहाण; दुकान बंद करण्यावरून झाला वाद

'माझ्या आयुष्यातून निघून गेला तर..' माजी उपसरपंचाच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT