Early signs of lung cancer saam tv
लाईफस्टाईल

Early signs of lung cancer: फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही दुर्लक्ष करू नका

Lung cancer symptoms: जर वेळेत या लक्षणांकडे लक्ष दिले, तर योग्य निदान आणि उपचार शक्य आहे. फुफ्फुसांचा कर्करोग होण्यापूर्वी शरीरात काही विशिष्ट बदल दिसून येतात, जे चुकूनही दुर्लक्षित करू नयेत.

Surabhi Jayashree Jagdish

  • फुफ्फुसाचा कॅन्सर जीवघेणा आजार आहे.

  • सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखणे गरजेचे आहे.

  • सतत खोकला आणि रक्त येणे धोक्याचे संकेत आहेत.

फुफ्फुसांचा कॅन्सर हा जगातील सर्वात जीवघेण्या आजारांपैकी एक मानला जातो. बहुतेकदा हा आजार उशिरा समोर येतो, जेव्हा त्यावर उपचार करणं कठीण होतं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जर याचं सुरुवातीची लक्षणं वेळेत ओळखली तर यावर उपचार शक्य होतात.

मात्र कोणत्याही आरोग्याच्या समस्येची लक्षणं दिसून येतात. असंच शरीर आधीच काही संकेत देऊ लागतं पण लोक त्यांना किरकोळ समजून दुर्लक्ष करतात. ही लक्षणं नेमकी काय आहे आणि ती कधी दिसून येतात ते जाणून घेऊया.

खोकला आणि रक्त येणं

फुफ्फुसाच्या कॅन्सरचं एक सामान्य सुरुवातीचं लक्षण म्हणजे सतत खोकला होणं. जर खोकला सलग एक-दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याचप्रमाणे खोकताना रक्त येणं हे देखील कॅन्सरचं एक गंभीर लक्षण असू शकतं.

श्वास घेण्यात त्रास आणि छातीत वेदना

दैनंदिन काम करताना अचानक श्वास लागणं किंवा खोल श्वास घेताना छातीत वेदना होणं हीसुद्धा सुरुवातीची लक्षणं असू शकतात. हे फुफ्फुसात हवेच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे होतं.

वजन कमी होणं

काही रुग्णांमध्ये कॅन्सर वाढू लागल्यावर भूक कमी होते आणि प्रयत्न न करता देखील वजन झपाट्याने कमी होऊ लागतं. हे देखील आजाराचे एक महत्त्वाचं संकेत आहे.

थकवा आणि वारंवार संसर्ग

कॅन्सरमुळे येणारा थकवा हा नेहमीच्या थकव्यापेक्षा वेगळा असतो. यामध्ये व्यक्तीला विश्रांती घेतल्यानंतरही जात नाही. याशिवाय वारंवार ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनिया सारख्या श्वसनाच्या आजारांनी त्रास होणं, हा धोक्याचा इशारा असू शकतो.

चेहरा आणि मानेमध्ये सूज

काही रुग्णांमध्ये चेहरा आणि मानेत सूज येते. हे रक्तवाहिन्यांवर वाढलेल्या दाबामुळे होण्याचा धोका असतो. त्यासोबतच आवाज बसणं किंवा जड होणेही दिसून येते.

वेळेवर तपासणी आवश्यक

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, शरीराचे हे संकेत दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं. लवकर तपासणी आणि योग्य उपचार हे फुफ्फुसाच्या कॅन्सरपासून बचाव करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत.

फुफ्फुसाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे महत्त्वाचे लक्षण कोणते?

सतत खोकला आणि खोकताना रक्त येणे हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे महत्त्वाचे लक्षण आहे.

श्वास घेण्यात त्रास का होतो?

फुफ्फुसात गाठ वाढल्यामुळे हवेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो.

वजन कमी होण्याचे कारण काय?

कॅन्सरमुळे भूक कमी होते आणि शरीराची ऊर्जा खर्च होते, त्यामुळे प्रयत्न न करता वजन झपाट्याने कमी होते.

थकवा आणि संसर्गांचे संबंध काय?

कॅन्सरमुळे येणारा थकवा विश्रांतीनंतरही जात नाही. तसेच प्रतिकारशक्ती कमजोर होऊन ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया सारखे संसर्ग वारंवार होतात.

चेहरा आणि मानेत सूज का येते?

कॅन्सरच्या गाठीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो, त्यामुळे चेहरा आणि मानेत सूज येऊ शकते. आवाज बसणे किंवा जड होणेही याचे लक्षण आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT