Early kidney disease diagnosis saam tv
लाईफस्टाईल

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

Early kidney disease diagnosis: मधुमेहामुळे होणाऱ्या किडनीच्या नुकसानीला 'डायबेटिक नेफ्रोपॅथी' असे म्हणतात. सुरुवातीला याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत, परंतु किडनी निकामी होण्यापूर्वी शरीरात काही विशिष्ट बदल दिसू लागतात

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेहाचा परिणाम जवळपास सर्व आरोग्यावर होत असतो. तर ती आपल्या शरीरातील इतर अवयवांवरही गंभीर परिणाम करू शकते. विशेषतः किडनीवर या आजाराचा परिणाम खूप गंभीर स्वरूपात होतो. ही स्थिती डायबेटिक किडनी डिसीज किंवा डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणून ओळखली जाते. सध्या भारतात ही समस्या झपाट्याने वाढत असून लोकांना याविषयी अधिक जागरूक होण्याची गरज आहे.

डायबिटीज किडनीवर परिणाम कसा करते?

आपल्या शरीरातील किडनी हे टॉक्सिक घटक नको असलेलं पाणी आणि अपायकारक द्रव्यं बाहेर टाकण्याचं काम करतं. या कामासाठी किडनीमध्ये लाखो नेफ्रॉन नावाचे छोटे फिल्टर असतात. पण जेव्हा रक्तात साखरेचं प्रमाण अनेक महिन्यांपर्यंत वाढलेलं राहतं तेव्हा हे नेफ्रॉन खराब होऊ लागतात.

त्याचा परिणाम असा होतो की शरीराला आवश्यक असलेलं प्रोटीन जसं की, अल्ब्युमिन तेही लीक होऊन लघवीतून बाहेर पडायला लागतं. हळूहळू किडनीचं कार्य बिघडतं आणि जर वेळेत लक्ष दिलं नाही. तर किडनी पूर्णपणे फेल होण्याची शक्यता वाढते. अशावेळी शरीर तुम्हाला याचे संकेत देत असतं. हे संकेत वेळीच ओळखणं गरजेचं असतं.

किडनी डॅमेजचे सुरुवातीचे संकेत

लघवीतून फेस येणं

लघवीत फेस जाणं हे किडनी खराब होण्याचं एक सुरुवातीचं आणि महत्त्वाचं लक्षण आहे. असं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही स्थिती युरिन टेस्टमधून स्पष्ट होते.

शरीरावर सूज येणं

किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात पाणी साचायला लागतं. यामुळे पाय, टाच, हात किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागते.

वारंवार लघवी होणं

किडनी निकामी होत असल्यास लघवीवरचं नियंत्रण बिघडतं. यावेळी लघवी वारंवार लागते आणि शरीरामध्ये शक्ती कमी होते. शिवाय यावेळी व्यक्तीला थकवाही जाणवतो.

भूक मंदावणं

शरीरातील टॉक्सिन्स नीट बाहेर न पडल्याने भूक लागत नाही. परिणामी मळमळ होऊ शकते. पोट बिघडल्यासारखं वाटतं.

डोळ्यांखाली सूज येणं

लघवीतून प्रोटीन गेल्यामुळे डोळ्यांभोवती सूज येण्याची समस्या जाणवते. त्याचप्रमाणे त्वचेवर खाज येणं, कोरडेपणा जाणवणं यासारख्या लक्षणांची दखल घेणं गरजेचं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metabolism: मेटाबॉलिजम रेट वाढवण्यासाठी दररोज खा 'हे' पदार्थ

Suresh Dhas: धसांचा डाव, मुंडेंवर घाव? 'कृषी घोटाळ्याची SIT चौकशी करा'

Gold Ring: 10 रुपयांच्या कॉईनमधून सोन्याची अंगठी? तुमच्याकडे तर कॉईनवाली अंगठी नाही ना?

Nandini Kashyap Hit And Run Case: लोकप्रिय अभिनेत्रीनं २१ वर्षीय विद्यार्थ्याला चिरडलं; अपघाताचा CCTV व्हिडिओ व्हायरल

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलीसच गुन्हेगार; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका|VIDEO

SCROLL FOR NEXT