Warning signs before a heart attack
Warning signs before a heart attacksaam tv

Heart Attack Early Signs: हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना अगोदर शरीर देतं हे संकेत; वेळीच ओळखा लक्षणं

Heart attack warning signs: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर काही संकेत देते, जे लोक सामान्य समजून दुर्लक्ष करतात. ही लक्षणं कधीकधी एक महिना किंवा त्याही आधीपासून दिसू शकतात.
Published on

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा झटका ही एक मोठी समस्या आहे. अनेक वेळा हा अटॅक अचानक येतो आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याइतकाही वेळ मिळत नाही. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण जर शरीर आधीच काही लक्षणं देत असेल आणि आपण ती वेळेत ओळखली, तर उपचार घेऊन जीव वाचवता येऊ शकतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हार्ट अटॅक एकदम येत नाही. मुख्य म्हणजे शरीर त्याचे संकेत बरेच आधीपासून देत असतं. केवळ आपणच ते ओळखण्यात कमी पडतो किंवा दुर्लक्ष करतो. म्हणूनच, या लक्षणांकडे वेळेत लक्ष दिलं आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर हृदयविकाराच्या मोठ्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.

आज आम्ही तुम्हाला अशाच हार्ट अटॅकच्या लक्षणांबाबत सांगणार आहोत जी हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर अगोदर तुम्हाला दिसून येतात. ही लक्षणं काय आहेत ती पाहूयात.

छातीत जडपणा किंवा वेदना

छातीत वारंवार जडपणा, जळजळ किंवा दबाव जाणवत असेल, तर काळजी घ्या. हृदयाच्या रक्तवाहिन्या जेव्हा हळूहळू ब्लॉक होऊ लागतात, तेव्हा अशा प्रकारचे त्रास जाणवायला लागतात. हा त्रास केवळ छातीतच न होता, कधी कधी खांदे, जबडा, गळा किंवा पाठीमध्येही पसरतो.

Warning signs before a heart attack
Period Pain : पीरियड्समध्ये पेनकिलर्स घेणं किती धोकादायक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

लवकर थकवा आणि सतत अशक्तपणा

सकाळी उठल्यावरच अशक्तपणा जाणवतो का? काही विशेष शारीरिक मेहनत न करताही लगेच दमायला होतं का? जर हो, तर हा हृदय कमजोर असण्याचा संकेत असू शकतो. हृदय जर शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त योग्य प्रमाणात पोहोचवू शकत नसेल, तर माणूस लगेच थकतो. हा लक्षण विशेषतः महिलांमध्ये जास्त दिसून येतो.

अनावश्यक किंवा अचानक जास्त घाम येणे

थंडीच्या किंवा एसी चालू असलेल्या वातावरणातही तुम्हाला खूप घाम येतोय का? शरीराला घाम का येतो, तर हृदय जेव्हा नीट रक्त पंप करू शकत नाही. अशावेळी शरीर जास्त मेहनत करतं आणि त्यामुळे घाम येतो. हा घाम काही वेळा थोडक्याच कामातही ओसंडून वाहतो.

शरीराच्या वरच्या भागात वेदना

खांदे, मानेजवळ, जबड्यात किंवा पाठीमध्ये काही वेदना होत आहेत का आणि या वेदना विशिष्ट कारणाशिवाय वारंवार होत आहेत का? जर हो, तर हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. हार्ट अटॅक येण्याच्या आधी रक्तप्रवाह व्यवस्थित न झाल्यामुळे शरीराच्या वरच्या भागांमध्ये अशा वेदना जाणवू शकतात.

Warning signs before a heart attack
Thyroid Symptoms Morning : सकाळी उठताच दिसून येतात थायरॉईडची ५ लक्षणं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

चक्कर येणं, डोकं फिरणं

तुमचं डोकं अचानक हलकं होतंय का? उभं राहिल्यावर डोळ्यांसमोर अंधार येतोय का? चक्कर येतेय का? हे सुद्धा हृदयाची ताकद कमी असल्याचं एक लक्षण आहे. जेव्हा हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करत नाही तेव्हा मेंदूपर्यंत ऑक्सिजन नीट पोहोचत नाही त्यामुळे चक्कर येते, डोकं हलकं वाटतं.

Warning signs before a heart attack
Stomach Cancer Early Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ महत्त्वाचे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com