Symptoms of high cholesterol in body saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीराच्या 'या' भागांचा रंग बदलतो; हार्ट अटॅकचा धोका वेळीच ओळखा

Symptoms of High Cholesterol in body: कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने शरीरात बरेच बदल होऊ शकतात. यामध्ये तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की काही अवयवांचे रंग बदलू लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल कोलेस्ट्रॉल हा शब्द तुम्ही ऐकला असेल. आपल्या शरीरामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं की हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. मुळात कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात, एचडीएल म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि एलडीएल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात.

डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्यानंतरच कोलेस्ट्रॉलची पातळी कळते, असं म्हणतात. परंतु कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने शरीरात बरेच बदल होऊ शकतात. यामध्ये तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की काही अवयवांचे रंग बदलू लागतात. यावरून तुम्हाला पुढचे धोके समजण्यास मदत होते.

डोळ्यांभोवती पिवळे डाग

कोलेस्टेरॉल वाढल्याने डोळ्यांभोवती पिवळे डाग किंवा गाठी तयार होऊ शकतात. हे डाग कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे उद्भवतात. हे बदल खालच्या पापणीवर दिसून येतात. हे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्याचं लक्षण असू शकतं.

पाय-बोटांची त्वचा

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने रक्त प्रवाहावर परिणाम होण्याची शक्यता दाट असते. यामुळे पाय आणि बोटांवरील त्वचा निळी किंवा पांढरी होऊ लागते. हे धमन्यांमधील अडथळा किंवा खराब रक्ताभिसरणाचं लक्षण असू शकतं.

चेहऱ्यावरील त्वचेचा रंग बदलणं

ज्यावेळी शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी खूप जास्त वाढते तेव्हा चेहऱ्याची त्वचा फिकट होऊ शकते. जेव्हा शरीरात अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जमा होतं, तेव्हा ते यकृतावर दबाव निर्माण होतो. ज्यामुळे रक्तात यकृताच्या घटकांचे प्रमाण जास्त होऊन चेहऱ्याचा रंग काहीसा बदलतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT