Early Signs of Lung Cancer saam tv
लाईफस्टाईल

Early Signs of Lung Cancer: बोटं आणि नखांवर फुफ्फुसांच्या कॅन्सरची दिसतात 'ही' लक्षणं; चुकूनही इग्नोर करू नका

Lung Cancer Symptoms on Fingers: फुफ्फुसाचा कॅन्सर हा जगातील सर्वात गंभीर आणि जीवघेणा आजारांपैकी एक आहे. अनेकदा त्याची लक्षणं श्वसन प्रणालीशी संबंधित असतात, जसं की खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणं.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्याला कोणताही आजार असो, शरीर त्याचे संकेत देत असतं असं म्हटलं जातं. अनेकदा आपल्याला झालेल्या आजारांची लक्षणं ही नखांवर किंवा हाताच्या बोटांवर दिसून येतात. यामध्ये फिंगर क्लबिंग अशी एक अवस्था असते. ज्यात शरीरात सुरू असलेल्या गंभीर आजारांचे संकेत मिळण्यास महत होते. यामध्ये विशेषतः फुफ्फुसांच्या कॅन्सरशी संबंधित लक्षणं समजून येण्यास मदत होते.

लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसांचा कॅन्सर हा जगातील सर्वात घातक कॅन्सरपैकी एक मानला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लंग कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणं फार सौम्य असतात. त्यामुळे अनेक जण ही लक्षणं पाहून त्याकडे दुर्लक्ष करतात. अशात फिंगर क्लबिंगसारख्या सूक्ष्म लक्षणांकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

फिंगर क्लबिंग म्हणजे काय?

फिंगर क्लबिंग किंवा डिजिटल क्लबिंग म्हणजे बोटांच्या टोकांवर सूज येणं. यामध्ये काही वेळा नखांच्या आकारात बदल होऊ शकतो. हे बदल हळूहळू विकसित होतात आणि सुरुवातीला ओळखणं कठीण होतं. यामध्ये खालील लक्षणं दिसू शकतात.

  • बोटांची टोकांचा जाडसर होणे

  • नखे वाकलेली दिसतात

  • नखं आणि क्युटिकलमधील कोन वाढतो

  • सुरुवातीला नखांच्या भोवती थोडी लालसरपणा दिसतो, तर नंतर नखं चमकदार आणि चम्मचासारखी वाकलेली होतात

लंग कॅन्सर आणि फिंगर क्लबिंग यांचा संबंध

संशोधनानुसार, लंग कॅन्सरच्या सुमारे ८०% रुग्णांमध्ये फिंगर क्लबिंग दिसून येतं. हे लक्षण बहुतेक वेळा आजाराच्या पुढच्या अवस्थेत पाहायला मिळतं. यामागे शरीरात ऑक्सिजनची कमतरता आणि काही ग्रोथ फॅक्टर्सचं अधिक उत्पादन कारणीभूत ठरू शकतं.

बोटं आणि नखांमध्ये दिसणारी इतर लक्षणं

  • नखं निळसर होणं – रक्तात ऑक्सिजन कमी असल्याचे संकेत

  • बोटांमध्ये सूज – जडपणा किंवा फुगवटा

  • नखांची रचना बदलणं – रेघ येणं, तुटणं किंवा अतिवेगाने वाढणं

  • सुन्नपणा किंवा झिणझिण्या – नसांवर दबाव किंवा कॅन्सरशी संबंधित इतर समस्या

फिंगर क्लबिंग फक्त फुफ्फुसांच्या कर्करोगामुळेच होत नाही. यामागे इतर आजारही असू शकतात

  • दीर्घकालीन फुफ्फुसांचे संक्रमण – ब्रॉन्कीएक्टेसिस, सिस्टिक फायब्रोसिस

  • यकृताचे आजार – सिरोसिस

  • इतर कॅन्सर – लिव्हर कॅन्सर, हॉजकिन्स लिम्फोमा

  • वायरल संक्रमण – HIV, हेपेटायटीस B आणि C

उपचार काय आहे?

फिंगर क्लबिंगसाठी स्वतःचा स्वतंत्र उपचार नसतो. याचे मूळ कारण म्हणजे संबंधित आजार. तो नियंत्रणात आणल्यास क्लबिंग कमी होऊ शकतं. जर कारण तात्पुरतं किंवा बरं होणारं असेल, तर सुधारणा होऊ शकते. पण लंग कॅन्सर किंवा दीर्घकालीन आजारांमध्ये हे बदल स्थायी असू शकतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health: निरोगी हृदय ठेवायचं आहे? तर आजच फॉलो करा 'या' चांगल्या सवयी

Maharashtra Live News Update: रत्नागिरी- समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा गणपतीपुळेला फटका

तिशीनंतर हाडांचं दुखणं वाढलंय? रोज खा '१' पदार्थ; दुधापेक्षाही दुप्पट कॅल्शियम मिळेल

Maharashtra Cyclone Alert : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही तास धोक्याचे, वाचा IMD ने काय इशारा दिला?

Wedding Shubh Muhurta: लग्नाचा बार उडणार! ८ महिने असणार शुभ मुहूर्त, तारखांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT