Ganesh Visarjan Muhurat 2025 saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Visarjan: अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी आहेत 'हे' ५ मुहूर्त; जाणून घ्या योग्य विधी

Ganesh Visarjan Muhurat 2025: गणपती बाप्पाच्या दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला होते. या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह असतो. गणपती विसर्जन (गणेश विसर्जन) योग्य मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करणे खूप महत्त्वाचे मानले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

  • अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.

  • विसर्जन शुभ मुहूर्त सकाळी ७:३६ ते रात्री १:४५ पर्यंत आहे.

  • दहा दिवसांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी विसर्जन करावे.

गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून सुरू होऊन अनंत चतुर्दशीपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या उत्सवानंतर गणरायाला निरोप दिला जातो आणि विसर्जनाची विधी पार पाडली जाते.

यंदा अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे. या दिवशी कोणते शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत आणि गणपतीचे विसर्जन कसे करावे ते जाणून घेऊया.

गणेश विसर्जन मुहूर्त २०२५

  • चतुर्दशी तिथी सुरू – ६ सप्टेंबर २०२५, पहाटे ३:१२

  • चतुर्दशी तिथी समाप्त – ७ सप्टेंबर २०२५, पहाटे १:४१

शुभ मुहूर्त

  • प्रातः मुहूर्त (शुभ) – सकाळी ०७:३६ ते ०९:१०

  • अपराह्न मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – दुपारी १२:१९ ते संध्याकाळी ०५:०२

  • सायंकालीन मुहूर्त (लाभ) – संध्याकाळी ०६:३७ ते रात्री ०८:०२

  • रात्रीचे मुहूर्त (शुभ, अमृत, चर) – रात्री ०९:२८ ते पहाटे ०१:४५

  • उषाकालीन मुहूर्त (लाभ) – ७ सप्टेंबर रोजी सकाळी ०४:३६ ते ०६:०२

दहा दिवसांनंतरच विसर्जन का करावे?

शास्त्रांनुसार, गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना करून दहा दिवसांचा संकल्प घेतला जातो. त्यामुळे अनंत चतुर्दशीला हा संकल्प पूर्ण करून गणरायाला निरोप देणे आवश्यक मानले जाते. योग्य वेळी व योग्य विधीने विसर्जन न केल्यास धार्मिक दृष्ट्या दोष लागू शकतो, अशी मान्यता आहे.

गणेश विसर्जन विधी

  • विसर्जन नेहमी शुभ मुहूर्तात करावा.

  • विसर्जनापूर्वी गणेशाची अंतिम पूजा करून त्यांना दूर्वा, फुलं, मोदक आणि लाडू अर्पण करावेत.

  • “ॐ गं गणपतये नमः” या मंत्रासह गणेश स्तोत्राचे पठण करावे.

  • घरातील सर्वांनी मिळून बाप्पाची आरती करून त्यांना उत्साहात निरोप द्यावा.

  • विसर्जन मिरवणुकीदरम्यान “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करावा.

  • घरी विसर्जन करत असाल तर स्वच्छ भांड्यात पाणी घेऊन त्यात मूर्ती ठेवावी.

  • मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना घालावे, यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होते.

गणेश विसर्जन २०२५ मध्ये कोणत्या तारखेला आहे?

गणेश विसर्जन ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.

अनंत चतुर्दशीचे शुभ मुहूर्त कोणते आहेत?

सकाळी ७:३६ ते रात्री १:४५ या वेळेत शुभ मुहूर्त आहेत.

गणेश विसर्जन का दहा दिवसांनंतर करावे?

दहा दिवसांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी विसर्जन करावे.

विसर्जनापूर्वी कोणती पूजा करावी?

अंतिम पूजा करून मोदक, लाडू, फुले अर्पण करावीत.

पर्यावरणाच्या दृष्टीने विसर्जन कसे करावे?

घरी स्वच्छ भांड्यात पाणी घेऊन मूर्ती विरघळवून झाडांना पाणी घालावे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती

युद्धाच्या नावाखाली सट्टेबाजीचा संशय, शेअर मार्केट घोटाळ्याचं ट्रम्प कनेक्शन?

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

SCROLL FOR NEXT