
कालपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी हा दहा दिवसांचा मंगल उत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून सुरू होतो. पहिल्या दिवशी भक्त मोठ्या आनंदाने आणि उत्साहात बाप्पांना घरी आणतात आणि विधीपूर्वक त्यांची स्थापना करतात. देशभरात सुंदर पंडाल सजवले जातात, तर घराघरात २, ५, ७ किंवा थेट १० दिवसांसाठी गणपती बसवून त्यांची पूजा-अर्चा केली जाते.
या दिवसांत दररोज बाप्पांना नैवेद्य अर्पण करणं, गणपती चालीसा, मंत्रांचा जप करणं आणि शेवटी आरती करणं आवश्यक मानलं जातं. असं केल्याने पूजा पूर्ण होतं आणि गणरायाचे विशेष आशीर्वाद लाभतात. चला तर मग जाणून घेऊया गणेश आरती आणि त्यासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी.
गणपतीची आरती अत्यंत पवित्र आणि कल्याणकारी मानली जाते. पण ही आरती जर नियम न पाळता किंवा भावनाशून्य पद्धतीने केली. तर तिचे पूर्ण फळ मिळत नाही. म्हणूनच आरती करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
आरती करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. अस्वच्छ वस्त्रात किंवा न अंघोळ करता आरती करणे योग्य मानले जात नाही.
आरतीसाठीचा दिवा नेहमी तूप किंवा शुद्ध तेलाचा असावा. विझलेला किंवा अर्धवट पेटलेला दिवा वापरणं अशुभ मानलं जातं.
आरती करताना दिवा नेहमी घड्याळाच्या दिशेने फिरवावा. याच्या विरुद्ध दिशेने आरती करणं वर्ज्य आहे.
आरतीच्या वेळी मन पूर्णपणे देवावर केंद्रित असावे. मोबाईल, गप्पा किंवा इतर कामांत लक्ष घालणे टाळावे.
आरती झाल्यानंतर दिव्याची ज्योत कुटुंबातील सर्वांना दाखवावी. ही पद्धत पाळली नाही तर ती अशुभ मानली जाते.
आरती म्हणताना घाईगडबड, हशा-मस्करी किंवा हलगर्जीपणा टाळावा. ती श्रद्धा, शांतता आणि भावनेने म्हणावी.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.