Symptoms before stroke saam tv
लाईफस्टाईल

Stroke warning signs: स्ट्रोक येण्याच्या 1 महिना आधी शरीरात होतात 'हे' मोठे 5 बदल; लक्षण ओळखून वेळीच डॉक्टरांकडे जा

Symptoms before stroke: स्ट्रोक म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनी फुटणे किंवा त्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे मेंदूच्या एका भागाला रक्तपुरवठा बंद होणे. ही लक्षणे अचानक दिसतात आणि ती तात्पुरती असली तरी, स्ट्रोकचा धोका दर्शवतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • स्ट्रोक हा आरोग्यासाठी गंभीर धोका असून वेळेत ओळखल्यास जीव वाचवता येतो.

  • स्ट्रोकची लक्षणे 2 ते 4 आठवडे आधीपासून शरीराद्वारे दिली जातात.

  • अचानक तीव्र डोकेदुखी ही स्ट्रोकची सुरुवातीची आणि महत्त्वाची खूण असू शकते.

स्ट्रोक ही एक गंभीर आरोग्याची समस्या मानली जाते. ही समस्या एखाद्याच्या आयुष्यावर आणि आरोग्यावर खोल परिणाम करू शकते. पण वेळेत लक्षणं ओळखून उपचार घेतल्यास स्ट्रोकचे गंभीर परिणाम टाळता येतात आणि आयुष्य वाचवता येऊ शकतं. बर्‍याच वेळा स्ट्रोक अचानक झाल्यासारखा वाटतो पण शरीर आधीच काही संकेत देत असतं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही लक्षणं स्ट्रोक होण्याच्या २-४ आठवडे आधीपासून दिसून येतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढतो. त्यामुळे या संकेतांची माहिती असणं आणि वेळेत डॉक्टरांशी संपर्क करणं खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रोक येण्याच्या आधी शरीर काही खास इशारे देतं जे समजून घेतल्यास स्ट्रोक टाळता येऊ शकतो.

अचानक आणि तीव्र डोकेदुखी

डोकेदुखी ही सामान्य गोष्ट आहे पण जर ती अचानक खूप तीव्र झाली आणि पूर्वी कधीच अशी झाली नव्हती तर ती मेंदूमध्ये झालेल्या सूज किंवा लहान रक्तस्रावाचं लक्षण असू शकतं. विशेषतः जर ही डोकेदुखी औषधांनी कमी होत नसेल तर ती दुर्लक्षित करू नका.

दृष्टी धुसर दिसणं

मेंदूतील रक्तप्रवाह कमी झाला की आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे एखाद्या डोळ्यात किंवा दोन्ही डोळ्यांत अचानक धुसर दिसणं, काही वेळासाठी दृष्टीच जाणं ही TIA (Transient Ischemic Attack) ची लक्षणं असू शकतात.

बोलण्यात अडचण येणं

एखादा व्यक्ती अचानक बोलणं अडखळतोय किंवा शब्द स्पष्ट उच्चारू शकत नाहीये किंवा दुसऱ्याचं बोलणं समजत नाहीये असं काही घडलं तर हेही स्ट्रोकचं लक्षण आहे. हे लक्षण काही मिनिटं किंवा तासभर टिकू शकतं. पण एकदाही असं झालं तरी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.

शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा मुंग्या येणं

जर चेहरा, हात किंवा पाय यापैकी काही एका बाजूला अचानक मुंग्या येत असतील किंवा ताकद जात असल्यासारखं वाटतंय तर हे स्ट्रोकचं महत्त्वाचं लक्षण आहे. हे लक्षण आपण थकलो आहोत किंवा झोपून उठल्यामुळे झालंय असं वाटून दुर्लक्ष करू नका.

अचानक चक्कर येणं किंवा समतोल बिघडणं

अचानक चालताना अडखळणं, चक्कर येणं, डोळ्यांपुढे अंधार येणं, उठता उठता तोल जाणं लागणं हेही मेंदूतील रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे होतं. हे लक्षण वृद्धांमध्ये जास्त दिसतं, पण कोणत्याही वयात हे दिसलं, तर तातडीनं लक्ष घ्या.

स्ट्रोकची लक्षणे किती आधीपासून दिसू शकतात?

स्ट्रोक होण्याच्या 2 ते 4 आठवडे आधीपासून शरीरात लक्षणे दिसू शकतात.

अचानक तीव्र डोकेदुखी का गंभीर आहे?

ती मेंदूमध्ये सूज किंवा लहान रक्तस्रावाचे लक्षण असू शकते, म्हणून ती गंभीर आहे.

दृष्टी धुंद होणे हे कशाचे लक्षण आहे?

मेंदूतील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे दृष्टी धुंद होणे हे TIA किंवा स्ट्रोकचे लक्षण आहे.

बोलण्यात अडचण येणे हे का धोकादायक आहे?

बोलण्यात अडचण येणे हे मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्याचे सूचित करते, म्हणून ते धोकादायक आहे.

शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे कशाचे संकेत आहे?

शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे हे स्ट्रोकचे महत्त्वाचे सुरुवातीचे लक्षण आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT