Kidney Stone Symptoms  meta ai
लाईफस्टाईल

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

Kidney Health : कंबरदुखी ही कितीही साधी समस्या वाटली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे वेळीच काही गंभीर आजारांची लक्षणं ओळखून त्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार केले पाहिजेत.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बदल म्हणजे खाण्यापिण्यात किंवा राहणीमानातच नाही तर कामाच्या पद्धतीत सुद्धा झालाय. कामात सलग ८ ते ९ तास बसून राहावं लागतं. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि तुम्हाला कमी वयातच काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातला एक सर्वात घातक आजार म्हणजे किडनी स्टोन हा आहे.

किडनीस्टोनचं सर्वात महत्वाचं लक्षण

कंबरेच्या एका बाजुला जर अचानक वेदना व्हायला सुरुवात झाली असेल आणि ती पोटाच्या खालच्या भागात होत असेल तर त्याला किडनी स्टोनचं गंभीर लक्षण समजा. डॉक्टर म्हणतात की, किडनीमध्ये तयार झालेला खडा जेव्हा मुत्रमार्गातून सरकतो तेव्हा तुम्हा खूप वेदना व्हायला सुरु होतात. या वेदना कधीही सुरु होतात.

लक्षात ठेवा की, किडनी स्टोनची सर्वात सुरुवातीची आणि सामान्य वाटणारी लक्षणं ही पाठ किंवा कंबरेच्या भागात वेदना होणे ही आहेत. पण त्यातला फरक तुम्ही ओळखला पाहिजे. किडनी स्टोनची लक्षणं ही सुरुवातीला दिसत नाहीत. म्हणूनच याला सायलेंट स्टोन म्हणतात. पण स्टोनमुळे मुत्रमार्गात अडथळा निर्माण होतो.

तुम्हाला या आजाराच्या लक्षणांमध्ये कंबरदुखी, पाठ दुखी, मळमळ, उलट्या, लघवी करताना जळजळ, वेदना अशी त्रासदायक लक्षणं जाणवतात. काही रुग्णांना सतत लघवीला जावं लागतं, काहींच्या लघवीतून रक्त येतं, लघवीचा रंग बदलो. जो गुलाबी किंवा लालसर होतो.

तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर उपचार केले पाहिजेत. पुरेसं पाणी पित राहिलं पाहिजे. हा किडनी स्टोन टाळण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. तसेच मिठाचं प्रमाण कमी ठेवणंही महत्त्वाचं आहे. ताप, थंडी, सतत उलट्या, लघवी करताना अडचण किंवा लघवीत रक्त दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips : नाकावरील ब्लॅक अन् व्हाइट हेड्स जात नाहीत? 'या' 5 टिप्स करा फॉलो

Atul Chavan Resign : मोठी बातमी! भाजप महिला आमदाराच्या पतीचा राजीनामा; PWD मुख्य अभियंतापद सोडलं

Maharashtra News Live: राऊत बोलत राहतात त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- छगन भुजबळ

IBPS Recruitment : सरकारी बँकांमध्ये मेगाभरती; ११००० पदे, अर्ज कसा कराल, महाराष्ट्रात किती पदे?

Tehseen Poonawalla: 'माझ्या घरावर पोलिसांची धाड, मला नजरकैदेत ठेवलं'; E-20 विरोधात उपोषणाआधीच तहसीन पुनावालांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT