Dirty Cholesterol Saam Tv
लाईफस्टाईल

Cholesterol Control : शरीरातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरतात हे 4 पदार्थ

How to Remove Dirty Cholesterol : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल म्हणजे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Health Tips: शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल म्हणजे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जेव्हा 200 mg/dL पेक्षा कमी असेल तर ते सामान्य समजले जाते. या पेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढले तर इतर अवयवनांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य आहार (Diet) घेणे फार गरजेचे आहे. तेलकट पदार्थ,जास्त चरबी युक्त पदार्थ खाणे टाळले पाहीजे आणि पोषकतत्वानी भरपूर असलेल्या पदार्थचा आहारात समावेश करावा.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे कारण त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो असे किल्व्हलँन्ड क्लिनिकच्या एका अहालानुसार समोर आले आहे की कोलेस्ट्रॉल (LDL) प्रमाण वाढले तर त्वरीत तुमच्या आहारत बदल करणे आवश्यक आहे.

काही पदार्थ (Food) शरीरातील कोलेस्ट्रॉलचा नाश करून त्याला शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात.त्यामुळे हृदशी संबधित आजार दूर रहाण्यास सहकार्य मिळते.

शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी 4 पदार्थ -

ओट्स मध्ये असलेले फायबरचे भरपूर प्रमाण कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तुमच्या आहारात ओट्सचा समावेश करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. दिवसाची सुरवात तुम्ही या पदर्थापासून करू शकता. बाजरी आणि राई सोबत तुम्ही याचे सेवन करू शकता.

चीया सीड्स, बदाम, अक्रोड चे सेवन केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित पणे तुमच्या आहारात याचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता. हृदयाशी संबंधित आजार दूर रहाण्यास देखील फायदेशीर आहे.

ब्लकबेरी, रसबेरी, ब्लूबेरी, डाळिंब, स्ट्रोबेरी या फळांचा समावेश आहारात करून तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होईल या फळांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते तसेच नाशपती, सफरचंद, केळी यात आवश्यक घटक असतात.त्यामुळे याचे सेवन करून तुम्ही आरोग्य सुधारू शकाल.

कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात सोयाबीन आणि टोफुच्या समावेश करणे गरजेचे आहे तसेच शाकाहारी लोकांसाठी हा खूप चांगला पर्याय असेल.जे लोक मांसाहार खातात त्यांनी त्यांच्या आहारात टूना फिश आणि सॅल्मन फिशचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : भगवान गणेशाची कृपा होणार, गुप्तधनाचे मार्ग सापडतील; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार, वाचा

Local Body Polls 2025 : 'पालिका निवडणुकीत VVPT नाही'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, VIDEO

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

SCROLL FOR NEXT