How To PCOS Control : PCOS म्हणजे पॉलिसीस्टिक ओवरी सिंड्रोम आजकाल ही एक कॉमन समस्या झाली आहे. या समस्येमध्ये महिलांच्या ओवरीमध्ये मेल सेक्स हार्मोन्स गरजेपेक्षा जास्त प्रमाणात दिसू लागतात. यामुळे ओवरीमध्ये अनेक सिस्ट बनले जातात. याचे अनेक साइड इफेक्ट्स असतात.
जसे वजन वाढणे, केस गळणे, पाळी (Menstruation) वेळेवर न येणे अशा प्रकारच्या गंभीर समस्या उद्धव लागतात. पीसीओएसच्या उपचारासोबत लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. इथे काही आयुर्वेदिक उपचार देखील आहेत त्यांना वापरले जाऊ शकते.
पीसीओएसची समस्या पूर्णपणे ठीक होऊ शकत नाही, परंतु याचे सिम्प्टम्स कंट्रोलमध्ये ठेवले जाऊ शकतात. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पीसीओएसला कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या तीन टिप्स (Tips) सांगितल्या आहेत.
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कच्च्या आणि ऑरगॅनिक मधापासून करा. सोबतच थोडं कोमट किंवा रूम टेंपरेचर नुसार पाणी घ्या. परंतु हे लक्षात ठेवा की, मधाला गरम पाण्यासोबत घेऊ नका नाहीतर ते एक टॉक्सीक बनुन जाईल. मध हे एक चांगले फॅट बर्नर मानले जाते. सोबतच मधाचे सेवन केल्याने तुमची गोड खाण्याची क्रेविंग संपेल.
रोस्टेड फ्लेक्स सीड्स, रोस्टेड तीळ आणि मेथी योग्य प्रमाणात घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. झोपायच्या वेळी ही पावडर गरम पाण्यासोबत प्या. असं केल्याने तुमचे हार्मोन्स बॅलन्समध्ये राहण्यास मदत होईल.
तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये तीस मिनिटे कोणतीही ऍक्टिव्हिटी पाहिजे. तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता. सोबतच एखादा मोकळ्या जागेवर किंवा सूर्याच्या प्रकाशात पाच हजार पाउले चालले पाहिजे. त्याचसोबत सायकलिंग, स्विमिंग, पळणे, हॅकिंग, रशी उडी, डान्स त्यामधील कोणतीही ऍक्टिव्हिटी तुम्ही एन्जॉय करू शकता.
ही गोष्ट लक्षात ठेवा -
हार्मोनल बॅलेन्स किंवा पीसीओएससाठी वजन कमी करत असताना तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की, व्यायाम करताना व्यायाम केला पाहिजे. इंटेन्स एक्सरसाइजमुळे कोलेस्ट्रॉल जास्त रिलीज होते. ज्यामुळे हार्मोन्सचे बॅलेंसिंग बिघडते. दररोज वीस मिनिटे ब्रीद वर्क करा. तुमच्यासाठी कपालभाती, अनुलोम विलोम, भामरी प्राणायाम, भास्त्रिका प्राणायाम.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.