Heart attack risk in young people saam tv
लाईफस्टाईल

Health tests before joining gym: तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; जीममध्ये व्यायाम करण्यापूर्वी आरोग्याच्या 'या' टेस्ट करून घ्याच

Heart attack risk in young people: अलीकडच्या काळात तरुण वयातील व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. व्यायाम, फिटनेस आणि निरोगी राहण्यासाठी अनेक तरुण जिममध्ये जातात.

Surabhi Jayashree Jagdish

  • जिम सुरू करण्यापूर्वी हृदय तपासणी अत्यंत आवश्यक आहे.

  • ३० वर्षांवरील व्यक्तींनी विशेष तपासणी करून घ्याव्यात.

  • ईसीजी हृदयाच्या विद्युत क्रिया तपासते.

फीट असलेल्या लोकांना खास करून तरूणांना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची प्रकरण वाढताना दिसतायत. त्यामुळे जिम किंवा व्यायाम सुरू करण्याआधी काही तपासण्या करून घेतल्या तर फायदेशीर ठरतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

विशेषत: ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे त्यांनी यांनी या तपासण्या करून घ्याव्यात. या तपासण्या केल्याने न दिसणारे किंवा न जाणवणारे हृदयविकार वेळेवर ओळखता येतात. ज्यामुळे मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.

जिम सुरू करण्यापूर्वी कराव्यात अशा महत्त्वाच्या तपासण्या

ईसीजी

ईसीजीमध्ये हृदयाची विद्युत क्रिया रेकॉर्ड होते. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित आहेत का किंवा त्यामध्ये अडथळा आहे का हे समजू शकते. ईसीजी तपासणी निर्णायक नसली तरी व्यायामादरम्यान धोकादायक ठरू शकणारे हृदयाचे विकार ओळखण्याचा हा चांगला प्रारंभिक उपाय आहे.

2D इको (Echocardiography)

ही अल्ट्रासाऊंडसारखी तपासणी आहे जी हृदयाचा आकार, पंपिंग क्षमता आणि झडपांचं कार्य दाखवते. यातून हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी (हृदयाच्या स्नायूंची जाडी वाढणं) हा आजारही लक्षात येतो. ज्याचं अनेकदा निदान होत नाही आणि व्यायामाच्या वेळी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

टीएमटी (Treadmill Test)

ही तपासणी व्यायामाच्या वेळी हृदयावर होणारा ताण तपासते. यातून व्यायामामुळे रक्तपुरवठा कमी होणं यासारख्या समस्या समजतात. जास्त वर्कआउट किंवा वेट ट्रेनिंग करायचं असणाऱ्यांसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे.

हृदयाचे बायोमार्कर्स – Troponin आणि NT-proBNP

ही रक्त तपासणी हृदयाच्या स्नायूंना झालेला किरकोळ ताण किंवा नुकसान लक्षात आणून देते. ट्रोपोनिन हे हृदयाला झालेल्या लहानसहान इजा दर्शवतं तर NT-proBNP हृदयाच्या भिंतींवर ताण आहे का हे सांगतं.

लिपिड प्रोफाईल आणि HbA1c

लिपिड प्रोफाईलमधून रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण समजण्यास मदत होते. HbA1c ही तपासणी मागील 3 महिन्यांतील सरासरी साखरेचं प्रमाण दर्शवते. ज्यामुळे प्रीडायबिटीज किंवा डायबिटीज ओळखता येते.

व्यायाम सुरू करण्यापूर्वी कोणत्या व्यक्तींनी हृदय तपासणी करून घ्यावी?

३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी.ईसीजी तपासणीचा उपयोग काय आहे?

ईसीजी तपासणीचा उपयोग काय आहे?

ईसीजीमध्ये हृदयाचे अनियमित ठोके किंवा विद्युत अडथळे ओळखता येतात.

2D इको तपासणी कोणत्या हृदयरोगाचे निदान करू शकते?

2D इको हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीचे निदान करू शकते.

ट्रेडमिल टेस्टचा उद्देश काय आहे?

ट्रेडमिल टेस्ट व्यायामादरम्यान हृदयावरील ताण तपासते.

ट्रोपोनिन आणि NT-proBNP च्या रक्त तपासणीचा उपयोग काय?

हृदयाच्या स्नायूंवरील ताण किंवा नुकसान याची लवकर ओळख होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dohale Jevan History: गरोदर महिलेचे डोहाळे जेवण का करतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

Maharashtra Live News Update: खासदार संजय राऊत आज अहिल्यानगर दौऱ्यावर

भंडारदऱ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, १५ ते १७ ऑगस्टदरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?|VIDEO

Kurla To Vengurla: गावतल्या मुलांची लग्न का नाही होतं? 'कुर्ला टू वेंगुर्ला' चित्रपटात उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट

Shukra Surya Yuti: शुक्राच्या राशीत बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या प्रत्येक इच्छा होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT