Erectile Dysfunction saam tv
लाईफस्टाईल

Erectile Dysfunction: पुरुषांमध्ये वाढतेय इरेक्लाइल डिस्फंक्शनची समस्या; पाहा कोणत्या पुरुषांना याचा अधिक धोका?

Erectile Dysfunction: पुरुषांमध्ये एक सामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे इलेक्टाईल डिस्फंक्शन. याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याची तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या आपल्या मागे लागतात. यामध्ये काही समस्या या शारीरिक संबंधांविषयी देखील असतात. पुरुषांमध्ये एक सामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे इलेक्टाईल डिस्फंक्शन. शारीरिक संबंधादरम्यान यामध्ये इरेक्शन न होणं, लिंगामध्ये ताठरता नसणं, काही लोक इरेक्शन कायम ठेवू न शकणं, काही सेकंदातच त्यांचं इरेक्शन होणं ही लक्षणे बघायला मिळतात.

मात्र आजकाल या समस्यांचं प्रमाण पुरुषांमध्ये वाढलेलं दिसून येतंय. याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याची तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिली आहे.

मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. जितेंद्र साखरानी म्हणाले की, पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन (नपुंसकत्व) ही एक सामान्य घटना आहे. याचा अर्थ असा होतो की जेव्हा लैंगिक संबंध येतो तेव्हा एक ताठरता प्राप्त करण्यास आणि स्थिर ठेवण्यास असमर्थता. हे एखाद्याच्या लैंगिक कार्यक्षमतेवर परिणाम करतं आणि एखाद्याच्या नातेसंबंधावर देखील परिणाम होऊ शकतो. हे एखाद्या पुरुषासाठी त्रासदायक, लाजिरवाणं आणि निराशाजनक असू शकते. हे एखाद्याच्या मानसिक आरोग्यास त्रास देऊ शकते.

इरेक्टाईल डिस्फंक्शनची कारणं काय आहेत?

इरेक्टाइल डिसफंक्शन (ईडी) ची कारणे म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार, पक्षाघात, अपस्मार, एथेरोस्क्लेरोसिस, पेल्विक सर्जरी, काही औषधे, धूम्रपान, थायरॉईड स्थितीसह हार्मोनल विकार आणि टेस्टोस्टेरॉनची कमतरता, लठ्ठपणा इत्यादी. शिवाय, मोठ्या संख्येने पुरुषांमध्ये तणावामुळे ही समस्या ओळखली जाते. ईडी असलेल्या पुरुषांना कमी आत्मसन्मानाचा सामना करावा लागू शकतो, असंही डॉ. साखरानी यांनी सांगितलं आहे.

कसे आहेत यावर उपचार?

ED ला संबोधित करण्यासाठी रुग्णाला दररोज व्यायाम करून, धूम्रपान सोडणं, औषधं घेणं, पेनाइल इम्प्लांट, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी अशा उपचार पद्धतींचा सल्ला देण्यात येतो. अशावेळी व्यक्तींनी आवश्यक असल्यास थेरपिस्ट किंवा सेक्सोलॉजिस्टची मदत घ्या.

कोणत्या व्यक्तींना इरेक्टाइल डिस्फंक्शनचा त्रास होऊ शकतो?

अधिक वय असलेले पुरुष

वाढते वय हे इरेक्टाइल डिसफंक्शनचे मुख्य कारण असू शकतं. सुमारे 50 टक्के वृद्ध पुरुषांना या समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या 40 ते 70 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये जास्त दिसून येते, असं संशोधनातून दिसून आलं आहे.

टेस्टोस्टेरोन हार्मोनचं प्रमाण कमी असणाऱ्या व्यक्ती

टेस्टोस्टेरॉन हा एक हार्मोन असून ते स्पर्मचं उत्पादन आणि सेक्स ड्राइव्ह उत्तेजित करतो. टेस्टोस्टेरॉन रक्तवाहिन्या उघडण्यास मदत करते. त्यामुळे लिंगामध्ये रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो. त्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी असल्यास त्यांना ही समस्या होऊ शकते.

धूम्रपान आणि मद्यपान

जे पुरुष जास्त प्रमाणात मद्यपान करतात किंवा धुम्रपान करतात त्यांना इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता असते. मद्यपान किंवा धूम्रपान लैंगिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT