Shruti Vilas Kadam
टीव्ही आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उद्या विवाह बंधनात अडकणार आहे.
प्राजक्ता गायकवाडच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधी थाटामाटात तिच्या घरी सुरु आहेत.
चुडा समारंभात प्राजक्ताने पारंपरिक हिरव्या आणि सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या. या बांगड्यांनी तिचा ब्राईडल लूक अधिक पारंपरिक दिसत होता.
मेहंदीच्या दिवशी प्राजक्ताने हिरव्या रंगाच्या पोशाखात सुंदर दिसत होती. तिच्या हातावर काढण्यात आलेल्या सुंदर मेहंदी डिझाइन्सनी तिचा वधू लूक खुलून दिसला.
घाणा-बांगड्यांच्या समारंभात ढोल-ताशांच्या तालात प्राजक्ताने मैत्रिणींसोबत नाचत धमाल केली. हा कार्यक्रम तिच्या लग्नातील अत्यंत आकर्षक सोहळा ठरला.
शंभुराज खुटवड हा एक उद्योगपती असून तो पैलवानही आहे. त्याचे कुटुंब राजकारणात सक्रिय आहे, त्यामुळे प्राजक्ता आता एका राजकीय कुटुंबाची सून होणार आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांच्या लग्नाची पत्रिका नुकतीच समोर आली आहे. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२४ वाजता हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे.