'मला धोका दिला'; हॉस्टेलमध्ये केली बायकोची हत्या, नंतर नवऱ्याचे WhatsApp स्टेट्स पाहून सारेच हादरले

tamil nadu crime news : हॉस्टेलमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केली. त्यानंतर नवऱ्याने बायकोच्या मृतदेहाचा फोटो WhatsApp स्टेट्सवर ठेवला.
tamil nadu news
tamil nadu crime Saam tv
Published On
Summary

तमिळनाडूत नवऱ्याकडून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बायकोची हत्या

आरोपीने काढला मृतदेहासोबत सेल्फी

'मला धोका दिला, असे स्टेटस आरोपीने व्हाट्सअॅपवर ठेवलं

तामिळनाडूतून खळबळजनक घटना समोर आली आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बायकोची नवऱ्याने निर्घृण हत्या केली आहे. बायकोची हत्या करून नवऱ्याने व्हाट्सअॅप स्टेटसवर मृतदेहाचा फोटो शेअर केल्यानंतर संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली. या हत्याकांडानंतर विरोधकांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

tamil nadu news
‘शिवसेना को हराना मुश्किल नही, नामुमकिन है’; बदलापूरच्या सभेत एकनाथ शिंदेंचा कुणाला इशारा?

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय व्यक्तीने हॉस्टेलमध्ये त्याच्या बायकोची हत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याने स्वत:ला पोलिसांना शरण गेला. त्याची २८ वर्षीय बायको कोयंबटूरमधील एका खासगी कंपनीत काम करत होती. वादानंतर नवऱ्यापासून वेगळं होऊन हॉस्टेलमध्ये राहत होती. ती मूळची तिरुनेलवेली जिल्ह्यातील मेलापलायमजवळ थारुवाई येथे राहायला होती.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती एस. बालामुरुगन रविवारी दुपारी बायकोला भेटायला हॉस्टेलमध्ये गेला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर नवऱ्याने बायकोची हत्या केली. त्यानंतर नवऱ्याने बायकोच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला. मृतदेहासोबत काढलेला सेल्फी व्हाट्सअॅप स्टेटसवर ठेवलं. त्याने स्टेटससोबत मला पत्नीने धोका दिला, असे कॅप्शन देखील दिले.

tamil nadu news
Accident : महामार्ग ओलांडताना घात झाला, भरधाव ट्रकची ८ दुचाकींना धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू

नवऱ्यासोबत सततच्या वादामुळे २८ वर्षीय महिला तिच्या दोन मुलांना आईकडे सोपवलं होतं. त्यानंतर ती स्वत: हॉस्टेलमध्ये राहत होती. या प्रकरणी रथिनापुरी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

tamil nadu news
Pune : पुणे जिल्ह्यात किती ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या, वाचा संपूर्ण यादी

हॉस्टेलमध्ये पुरुष नेमका कसा घुसला, यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात हॉस्टेलमध्ये घुसून महिलेची हत्या केल्याने विरोधकांनीही अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com