Arthritis in monsoon saam tv
लाईफस्टाईल

Arthritis in monsoon: पावसाळ्यात बळावते संधिवाताची समस्या; अधिक त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

Remedies for joint pain: पावसाळ्याच्या दिवसात संधिवात असलेल्या व्यक्तींमध्ये सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये कडकपणा वाढू शकतो. पावसाळ्यात आपल्या सांध्याची कशी काळजी घ्यावी आणि या दिवसात निरोगी कसे राहता येईल हे आज आपण जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

संधिवात हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामुळे सांध्यामध्ये जळजळ होते, ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि कडकपणा येतो. ऑस्टियोआर्थरायटिसच्या तुलनेत संधीवात हा सांध्याची झीज आणि सांधे मोडल्याने होतो, यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही निरोगी सांध्याच्या ऊतींवर हल्ला करते. ते मनगट, गुडघे आणि बोटांवर परिणाम करते आणि कालांतराने, उपचार न केल्यास कूर्चा आणि हाडांना देखील नुकसान पोहोचते.

या समस्येच्या लक्षणांमध्ये सांधे कडक होणं, थकवा येणं, सौम्य ताप आणि साध्यांना सूज येणं, सांध्यांसंबंधीत वेदना होणं यांचा समावेश आहे.

परेलच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमधील प्रमुख ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक डॉ. गिरीश भालेराव यांनी सांगितलं की, पावसाळ्यात संधिवाताची समस्या वाढते. आरए असलेल्या अनेक लोकांना पावसाळ्यात लक्षणे अधिक तीव्र होताना दिसू शकतात. वातावरणाचा दाब आणि आर्द्रता सारख्या बदलांमुळे ही समस्या उद्भवते. विशेषतः कमी दाब आणि जास्त आर्द्रतेमुळे सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा येऊ शकतो. याचा सांध्या भोवतीच्या ऊतींवर परिणाम होतो, ज्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा जाणवणे.

डॉ. भालेराव पुढे म्हणाले की, थंड आणि ओलसर हवामानात रक्ताभिसरण मंदावते आणि स्नायूंवर परिणाम होतो. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. शारीरिक हालचालींच्या अभावाने देखील सांधेदुखी होऊ शकते. पावसाळ्यात अतिरिक्त सावधगिरी बाळगणं आणि विलंब न करता अचूक उपायांचे पालन करणं गरजेचं आहे.

संधिवाताचा त्रास असलेल्या रूग्णांनी काय केलं पाहिजे?

संधिवात असलेल्या लोकांनी शरीर उबदार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि एक्टिव्ह जीवनशैली बाळगणं गरजेचं आहे. स्ट्रेचिंग, योगा किंवा घरात चालल्याने स्नायूंचा कडकपणा टाळता येतो आणि वेदनेवर देखील आराम मिळवण्यास मदत होते.

उबदार राहण्यासाठी संपूर्ण अंग झाकणारे कपडे घाला. स्नायूंची सूज कमी करण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिड युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. यामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांनी आहाराची निवड करा. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे वेळोवेळी सेवन करा. यासंबंधीची लक्षणं वाढल्यास तुमच्या डॉक्टरांना त्वरीत भेट द्या. नियमित काळजी घेतल्यास त्याचप्रमाणे आरोग्याबाबत सतर्क राहिल्यास पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT