मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने भारतात पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. ही घटना देशासाठी एक मोठी गोष्ट आहे. या शस्त्रक्रिया मुंबईत दोन रुग्णांवर झाल्या पण ऑपरेटिंग सर्जन डॉ. टी. बी. युवराजा हे ५,००० किलोमीटर दूर शांघायमध्ये बसून रोबोटच्या मदतीने काम करत होते.
भारतामध्ये 'तौमाई®' (Toumai®) नावाच्या रिमोट रोबोटिक सिस्टीमचा हा पहिला वापर आहे. याला सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनची मंजुरी मिळाल्यानंतरच ही प्रक्रिया करण्यात आली. यामुळे भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात रिमोट सर्जरीच्या नव्या शक्यता उघडल्या आहेत.
या दोन रुग्णांवर रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी आणि पार्शियल नेफ्रेक्टॉमी अशा गुंतागुंतीच्या युरोलॉजिकल शस्त्रक्रिया करण्यात आल्या. साता समुद्रा पार रोबोटिक सिस्टीम वापरूनही या प्रक्रिया सुरक्षित, अचूक पद्धतीने पूर्ण झाल्या आहेत.
या शस्त्रक्रियांसाठी हाय-स्पीड इंटरनेट, स्थिर डेटा ट्रान्समिशन आणि सेफ टेकनिकचा वापर करण्यात आला. या सिस्टीममध्ये फक्त १३२ मिलीसेकंद इतका कमी विलंब (latency) होता. त्यामुळे डॉक्टरला उपकरणं सहज हलवणं शक्यत होतं. आणि शस्त्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली.
डॉ. टी. बी. युवराजा यांनी याआधी ४,१०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, रिमोट रोबोटिक सर्जरीमुळे उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा दूरवरच्या रुग्णांपर्यंत पोहोचवता येते. दोन वेगवेगळ्या देशांमध्ये ही प्रक्रिया यशस्वी झाली आहे.
या प्रक्रियेदरम्यान 'तौमाई®' सिस्टीमने उत्कृष्ट कामगिरी केली. रिमोट कंट्रोल इतका सुरळीत होता की सर्जनना प्रत्यक्ष उपस्थित असल्यासारखं वाटत होतं. यामुळे सिद्ध झालं की, रिमोट रोबोटिक सर्जरी केवळ शक्यच नाही तर सुरक्षित आणि परिणामकारकही आहे.
हॉस्पिटलचे सीईओ डॉ. संतोष शेट्टी म्हणाले की, "भारतामध्ये पहिल्यांदाच आंतरखंडीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे भारतातील शस्त्रक्रियेचे भविष्य बदलणार आहे. सुरक्षित डिजिटल सुविधा आणि प्रगत रोबोटिक्सच्या मदतीने जगभरातील तज्ञांचे कौशल्य रुग्णांपर्यंत पोहोचवता येते."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.