New Financial Year Saam Tv
लाईफस्टाईल

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; "या" गोष्टी महागणार !

आजपासून नवीन आर्थिक वर्ष २०२२-२०२३ सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आजपासून नवीन आर्थिक वर्ष २०२२-२०२३ सुरुवात झाली आहे. या नवीन आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींनुसार १ एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा बोझा अधिक वाढणार आहे. टीव्ही, फ्रिज, एसी याबरोबरच मोबाईल (Mobile) घेणे देखील महागणार आहे. आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्कामध्ये बदल करण्यात आले होते. यामुळे १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या आयात (Import) शुल्कामध्ये काही वस्तू महागणार आहेत.

तसेच ज्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात आले आहे. ती उत्पादने देखील महागणार आहेत. तर दुसरीकडे एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या भावात ६ रुपये प्रती किलोने घसरले आहेत. यामुळे वाहनधारकांना आता १ एप्रिलपासून ६० रुपये प्रतिकिलो भावाने गॅस भरता येणार आहे. या अगोदर तो भाव ६६ रुपये प्रती किलो होता. सीएनजीवर व्हॅट १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या महाराष्ट्र (Maharashtra) सरकारच्या निर्णयावर संपूर्ण राज्यामध्ये सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.

हे देखील पहा-

वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यामध्ये १ एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचा फायदा ऑटो- रिक्षा, टॅक्सी चालक, प्रवासी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. सरकारने (government) १ एप्रिलपासून ॲल्युमिनियमवर ३० टक्के आयात शुल्क लावले आहे. याचा वापर टीव्ही, एसी आणि फ्रिजचे हार्डवेअर बनवण्यासाठी होतो. कच्च्या मालाचा पुरवठा महागल्यामुळे कंपन्या उत्पादनाचे दर वाढणार आणि त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. शिवाय कॉम्प्रेसरमध्ये वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवण्यात आले आहे.

यामुळे फ्रिज घेणे महागणार आहे. सरकारने एलईडी बल्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर मूळ सीमा शुल्कासह ६टक्के प्रतिपूर्ती शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आजपासून हा नवा नियम लागू झाल्यावर एलईडी बल्ब महाग होणार आहे. सरकारने चांदीवर आयात शुल्कामध्ये बदल केला आहे. ज्यामुळे चांदीची भांडी, वस्तू महाग होणार आहेत. शिवाय स्टीलचे भावही वाढले आहेत. यामुळे स्टीलची भांडी देखील महागण्याची शक्यता आहे. मोबाईलमधील प्रिंटेड सर्किट बोर्डवर सरकारने सीमा शुल्क लागू केले आहे.

यामुळे याची आयात महागणार असून कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. यामुळे ग्राहकांनाही मोबाईल खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वायरलेस ईयरबड तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही उपकरणांवरील आयात शुल्क वाढवले आहे. ज्यामुळे हेडफोनचा उत्पादन खर्च वाढणार असून कंपन्या आपल्या उत्पादनांचे दर वाढवणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT