Mysterious Beach saam tv
लाईफस्टाईल

Mysterious Beach: भारतातील रहस्यमयी समुद्र, जिथलं पाणी पाहता-पाहता होतं गायब, पाहा काय आहे याचं गूढ?

Surabhi Kocharekar

आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांचं रहस्य अजून उलगडू शकलेलं नाही. यामध्ये काही वाडे, काही मंदिरं तर एखादं घर यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बीच म्हणजेच समुद्राबद्दल सांगणार आहोत, जो भारतातील रहस्यमयी बीच म्हणून चर्चेत आले.

'हा' आहे भारतातील रहस्यमयी समुद्र

माहितीनुसार, हा समुद्र ओडिशामध्ये असून चांदीपुरा असं त्याचं नाव आहे. या समुद्रातील पाण्याचं रहस्य समजणं काहीसं कठीण आहे. हा समुद्र छोट्या शहरातील बालासोर गावाजवळ आहे. असं म्हटलं जातं, या समुद्राचं पाणी आपल्या डोळ्यादेखत नाहीसं होतं.

काही तासांसाठी गायब होतं समुद्राचं पाणी

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. या किनारा निर्जन असतो. असं म्हटलं जातं, काही तासांसाठी इथून समुद्र गायब होतो आणि काही काळाने समुद्राचं हे पाणी परत येतं. या बीचचं नाव चांदीपूर असून या ठिकाणी जाण्यासाठी बालासोर स्टेशनवर उतरावं लागतं. यानंतर हा समुद्र किनारा 30 किलोमीटर दूर आहे.

हाइड अँड सीकच्या नावानेही प्रसिद्ध आहे किनारा

याठिकाणचं पाणी काही तास गायब होऊन पुन्हा येत असल्याने याला हाइड अँड सिक समुद्र किनारा असंही म्हटलं जातं. एकंदरीत पाहिलं तर या समुद्रकिनाऱ्याजवळ झाडं आणि हिरवीगार वनस्पती पाहायला मिळतात.

प्रत्येक दिवशी घडते अशी घटना

या नैसर्गिक घटनेमुळे हा समुद्रकिनारा फार चर्चेत आहे. याठिकाणी भरती ओसरण्याची निश्चित कोणतीही वेळ नाहीये. हे चंद्राच्या चक्रावर आणि भ्रमण गतीवर अवलंबून असून हा बदल प्रत्येक दिवशी पहायला मिळतो. या ठिकाणी अजून एक आकर्षण आहे ते म्हणजे, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी झाला की, ओल्या वाळूमध्ये माती दिसून येतात. त्याचप्रमाणे लाल खेकडे देखील दिसून येतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT