Surya Grahan 2025 Effect on Zodiac Signs saam tv
लाईफस्टाईल

Surya Grahan 2025: पितृ पक्षात लागणार यावर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण; न्यायाधीश शनी बनवणार शक्तीशाली योग

Solar eclipse in Pitru Paksha: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणांना विशेष महत्त्व असते. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) २१ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण पितृ पक्षाच्या काळात येत आहे, जो पितरांना समर्पित असतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षीचं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण अत्यंत खास मानलं जात आहे. हिंदू परंपरेनुसार ग्रहणाचा संबंध राहू-केतूसोबत जोडूला जातो. असं मानलं जातं की, या दिवशी राहू किंवा केतु चंद्राला गिळून टाकतात. या वर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५, रविवार या दिवशी लागणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री १०:५९ ते पहाटे ३:२३ पर्यंत दिसेल. ग्रहणाचा मध्यबिंदू रात्री १:११ वाजता असणार आहे. म्हणजेच हे ग्रहण सुमारे ४ तास २४ मिनिटं टिकणार आहे.

या काळात पितृपक्षही सुरू असणार आहे. त्यावेळी शनी वक्री अवस्थेत मीन राशीत असेल. तर सूर्य कन्या राशीत असणार आहे. या दोन्ही ग्रहांची १८० अंशांवर प्रतियुती होणार आहे. त्यामुळे सूर्य-शनीचा संयोग काही राशींवर विशेष प्रभाव टाकणार आहे. या काळात कन्या राशीत बुध आणि चंद्र देखील असतील, ज्यामुळे शशि-आदित्य आणि बुध-आदित्य योग तयार होईल.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण आणि सूर्य-शनीची प्रतियुती खूप महत्त्वाची ठरणार आहे. खूप काळापासून अडकलेले प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकणार आहे आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. नोकरीसंबंधी नवीन संधी मिळणार आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीसाठी शनी-सूर्याची प्रतियुती शुभ ठरू शकणार आहे. जुनी कामं जी खूप काळापासून अडकली होती, ती आता पूर्ण होऊ शकतात. मित्रांसोबत छान वेळ घालवता येणार आहे आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. या काळात व्यवसायातील अडचणी दूर होणार आहेत.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येणार आहेत. करिअरमध्ये मोठी प्रगती होणार असून आत्मविश्वास वाढणार आहे आणि तुम्ही अनेक क्षेत्रांत यश मिळवू शकणार आहे. मोठा ऑर्डर किंवा डील हातात लागण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत; CM फडणवीसांचं झ्युरिचमध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

आई मला वाचव, श्वास घेता येत नाहीये; कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना साथ साथ? कोल्हापूरात पडद्यामागे काय घडतयं?

बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT