Benefits of walking SAAM TV
लाईफस्टाईल

Benefits of walking: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली! दररोज चाला फक्त इतकी पावलं, वजनही होईल कमी

Best time to walk: दररोज ठराविक पावले चालणे हे केवळ तंदुरुस्तीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. आधुनिक जीवनशैलीत बसून काम करण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्हाला फीट आणि फाईन राहण्यासाठी एक सोपा व्यायाम म्हणजे पायी चालणं...चालणं ही एक अशी एक्सरसाईज आहे ज्यासाठी तुम्हाला कोणतंही साधन किंवा पैसे लागत नाहीत. केवळ चालणं महत्त्वाचं नसून तुम्ही किती पावलं चालता, किती वेगाने चालता तसंच कोणत्या वेळी चालता हे देखील गरजेचं आहे.

पावलं मोजा

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाने दर दिवशी जवळपास १० हजार पावलं चाललं पाहिजे. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. मात्र दर दिवशी १० हजार पावलं चालणं गरजेचं आहे.

तुम्ही १० हजार पावलं चाललं पाहिजे का?

तुम्हाला दररोज १० हजार पावलं चालणं गरजेचं नाही. २०२५ मध्ये युनिवर्सिटी ऑफ सिडनीमध्ये झालेल्या एका अभ्यासात असं नमूद करण्यात आलंय की, जर तुम्ही दिवसाला ७ हजार पावलं जरी चालत असाल तरी त्याचा फायदा तुम्हाला होईल. कारण ७ हजार पावलं चालणं तुम्हाला १० हजार पावलं चालण्याइतकाच फायदा देतं.

७ हजार पावलंच का चालावीत?

कारण ७ हजार पावलं चालणं जास्त कठीण नाही. शिवाय दररोज ७ हजार पावलं चालल्यामुळे मृत्यूचा धोका थेट 47% कमी होतो. मुख्य म्हणजे १० हजार पावलं चालल्यानंतरही हेच फायदे मिळतात. इतकंच नाही तर डिंमेशियाचा, मधुमेहाचा धोका कमी होतो आणि वजनही कमी होतं.

किती पावलं चालणं योग्य आहे?

ज्या व्यक्ती एक्टिव्ह आहेत त्यांनी १० हजार पावलं चालावं, असं तज्ज्ञांचं मत आहे. तर ७ हजारांपेक्षा जास्त पावलं चालण्याने तुम्हाला फायदा होतो, असंही तज्ज्ञ म्हणतात. विज्ञान सांगतं की, तुम्ही जितके जास्त पावलं चालाल तितका तुम्हाला अधिक फायदा मिळतो.

चालण्याचा वेग महत्त्वाचा

जर तुम्ही चालत असाल तर चालतानाचा वेग फार गरजेचा आहे. वेगाने चालण्याने तुमचं हार्ट चांगलं राहतं शिवाय लठ्ठपणा कमी होतो आणि फॅट्स बर्न होण्यास मदत होते. तुम्ही तुमचा वेग फिटनेस लेवलनुसार बदलू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी चालणं तुम्हाला फायदा देईल.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

SCROLL FOR NEXT