Symptoms of bowel cancer saam tv
लाईफस्टाईल

Early symptoms of cancer: तरूणांमध्ये वाढतंय 'या' कॅन्सरचं प्रमाण; आजाराच्या सुरुवातील दिसून येतात मोठे बदल, वेळीच लक्ष द्या

Symptoms of bowel cancer: पूर्वी कोलन कॅन्सर (Colon Cancer) हा प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये आढळणारा आजार मानला जात होता, पण गेल्या काही वर्षांपासून तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • कोलोन कॅन्सर तरुणांमध्ये वेगाने वाढतो आहे.

  • २० ते ४० वयोगटातील लोक अधिक बळी ठरत आहेत.

  • जंक फूड आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत.

आजकाल तरूणाई देखील कॅन्सरच्या विळख्यात सापडत असल्याचं दिसून येतंय. मात्र अलीकडच्या संशोधनानुसार, कोलोन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याचा कॅन्सर आता तरुणांमध्येही वेगाने वाढतो आहे. विशेषतः २० ते ४० वयोगटातील लोक या आजाराच्या जास्त प्रमाणात बळी ठरत आहेत.

American Cancer Society आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यानुसार, कोलोन कॅन्सर आता तरुणांमध्ये आढळणारा तिसऱ्या क्रमांकावरचा सर्वाधिक सामान्य कॅन्सर बनला आहे.

काय सांगतंय संशोधन?

JAMA Network आणि National Institutes of Health (NIH) यांच्या अहवालानुसार, गेल्या दोन दशकांपासून २० ते ४९ वयोगटातील लोकांमध्ये कोलोन आणि रेक्टल कॅन्सरचे प्रमाण सतत वाढताना दिसतंय. American Cancer Society च्या २०२४ च्या अहवालानुसार, ५० वर्षांखालील वयातील कॅन्सरच्या नव्या रुग्णांमध्ये कोलोन कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, १९९० नंतर जन्मलेल्या तरुणांमध्ये या कॅन्सरचा धोका १९५० मध्ये जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे.

लक्षणं जी दुर्लक्ष केली जातात

तरुणांमध्ये दिसणारी लक्षणं सामान्य पचनाच्या त्रासासारखी वाटत असल्यामुळे दुर्लक्ष केली जातात, पण त्याचं गंभीर परिणाम होऊ शकतात-

  • पोटदुखी

  • शौचातून रक्त येणं

  • वारंवार जुलाब किंवा कॉन्स्टिपेशन

  • सतत थकवा आणि अशक्तपणा

  • अचानक वजन घटणं

  • पोट फुगलेलं जाणवणं

कमी वयात कॅन्सर होण्याची कारणं

तरुणांमध्ये कोलोन कॅन्सर वाढण्यामागे अनेक जीवनशैलीशी संबंधित कारणं आहेत:

  • सतत जंक फूड आणि रेड मीट खाणं

  • आहारात फायबरची कमतरता

  • दिवसाचे अनेक तास बसून काम करणं

  • धूम्रपान आणि मद्यपान

  • झोपेची कमी आणि मानसिक ताणतणाव

  • पचनासाठी गरजेचे असलेले गट बॅक्टेरिया (gut bacteria) असंतुलित होणं

बचावासाठी काय उपाय करू शकतो

  • फळं, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ खाणं सुरू करा

  • दररोज थोडा व्यायाम करा

  • दिवसभरात पाणी भरपूर प्या

  • धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा

  • पोटाशी संबंधित कोणतीही तक्रार असली तर दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

तरुणांमध्ये कोलोन कॅन्सर का वाढतो आहे?

जंक फूड, लाल मांस, फायबरची कमतरता, बसून काम करणे, धूम्रपान आणि ताणतणाव यामुळे तरुणांमध्ये कोलोन कॅन्सर वाढत आहे.

कोलोन कॅन्सरची मुख्य लक्षणे कोणती?

पोटदुखी, शौचात रक्त येणे, वारंवार जुलाब, अचानक वजन कमी होणे, सतत थकवा आणि पोट फुगणे ही मुख्य लक्षणे आहेत.

कोलोन कॅन्सरचा धोका कोणत्या वयोगटात जास्त आहे?

२० ते ४९ वयोगटातील तरुणांमध्ये कोलोन कॅन्सरचा धोका सर्वाधिक वाढत आहे.

कोलोन कॅन्सरच्या धोक्यात १९९० नंतर जन्मलेल्यांमध्ये किती वाढ झाली आहे?

१९९० नंतर जन्मलेल्या तरुणांमध्ये कोलोन कॅन्सरचा धोका १९५० मध्ये जन्मलेल्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.

कोलोन कॅन्सरपासून बचावासाठी कोणते उपाय फायदेशीर आहेत?

फळे, भाज्या, फायबरयुक्त आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी प्यावे, धूम्रपान-मद्यपान टाळावे आणि पोटाच्या तक्रारींवर त्वरित उपचार घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT