Holding urine habit SAAM TV
लाईफस्टाईल

Holding urine habit: सतत लघवी रोखून धरण्याची सवय आरोग्यासाठी घातक; तुम्ही विचारही केला नसेल असे होतील आजार

Holding urine habit dangerous health: सार्वजनिक ठिकाणी किंवा कामात व्यस्त असताना अनेकजण लघवीची भावना झाल्यावरही ती रोखून धरतात. ही सवय अनेकदा सोयीस्कर वाटू शकते, पण वैद्यकीय तज्ञांच्या मते, जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रवास करताना, मिटींगमध्ये किंवा ऑफिसमध्ये खूप कामात असताना अनेकजण लघवी रोखून धरतात. कदाचित अनेकदा तुम्हीही असं केलं असेल. काहींना ही सवय लागली असेल मात्र तुमची ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. असं केल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सतत लघवी रोखून धरली की, त्याचा तुमच्या किडनीवरही घातक परिणाम होतो. यामुळे काही आजारांचाही धोका वाढण्याची शक्यता असते.

किडनी स्टोनचा धोका

जर तुम्ही लघवी दीर्घकाळ रोखून धरत असाल तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. याचं कारण म्हणजे, लघवीमध्ये असणारे युरिक अ‍ॅसिड आणि कॅल्शियम ऑक्सलेट हे घटक शरीरातून बाहेर न पडता तसेच साचून राहतात. ज्यामुळे तुमच्या किडनीमध्ये स्टोन होऊ लागतात.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

महिलांमध्ये खास करून युटीआयची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते. ज्या व्यक्तींना मधुमेह असतो त्यांना देखील याचा धोका जास्त असतो. लघवीच्या माध्यमातून टॉक्सिन घटक निघून जातात. मात्र लघवी रोखून धरल्याने ते शरीराबाहेर पडत नाही आणि इन्फेक्शन होऊ शकतं.

किडनी डॅमेज

जर तु्म्ही सतत लघवी रोखून धरत असाल तर असं करू नका. यामुळे किडनीवर जास्त दबाब येऊन ती खराब होण्याची शक्यता वाढते. परिणामी किडनीच्या आजारांची धोका वाढण्याची शक्यता असते.

पेल्विक फ्लोअरचे नुकसान

दीर्घकाळ लघवी रोखून धरल्याने पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंमध्ये कमजोरी येण्याची शक्यता असते. यामुळे पोटाच्या खालच्या भागात वेदना होऊ लागतात. अशावेळी दीर्घकाळ लघवी न केल्यास पेल्विक खालीही सरकू लागतं.

ब्लॅडर फाटण्याचा धोका

सतत जर लघवी रोखून धरली तर ब्लॅडरचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. अशावेळी ब्लॅडरची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असतो. काही प्रकरणांमध्ये ब्लॅडर फाटूही शकतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये सकल मराठा समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Kolhapur : कोल्हापुरात बिबट्याचा धुमाकूळ! ऑन ड्युटी पोलिसावर हल्ला, रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

Vitamin D Side Effects: व्हिटॅमिन Dच्या जास्त डोस घेतल्यास किडनी स्टोनचा धोका, तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

Delhi car Blast Live updates : हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा

Salman Khan: सलमान खानच्या फार्महाऊस पार्टीत नेमकं काय होते? शहनाज गिलने उघड केलं गुपित

SCROLL FOR NEXT