Surabhi Jayashree Jagdish
किडनी सूज येणं ही एक गंभीर स्थिती असू शकते. ज्यावेळी किडनी सूज येते तेव्हा लघवी बाहेर येऊ शकत नाही आणि ते साचू लागते.
वारंवार लघवी करण्याची इच्छा होणं हे किडनीला सूज आल्याचं लक्षण असू शकतं.
लघवीचा रंग आणि वास बदलणं, लघवीला फेस येणं ही देखील किडनीला सूज आल्याची लक्षणं आहेत
गंभीर स्थितीत लघवीतून रक्त येणं हे देखील किडनीला सूज येण्याचं लक्षण असू शकतं
सकाळी उठल्यावरजर कंबरेभोवती वेदना किंवा पाठदुखी हे देखील किडनीच्या सूजेचं लक्षण आहे
पायांमध्ये सूज येणं हे देखील किडनी योग्यरित्या कार्य करत नसल्याचं लक्षण असू शकतं
जर यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.