जेवण बनवताना भाजी कापायची असेल तर तुम्ही चॉपिंग बोर्डचा वापर करता. जवळपास अनेकांच्या घरी चॉपिंग बोर्ड वापरला जातो. प्लास्टिक चॉपिंग बोर्ड वापरू नये सल्ला दिला जातो. कारण त्याचे तुकडे अन्नात मिसळल्याने कॅन्सरसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळेच आपण लाकडी चॉपिंग बोर्ड वापरतो. मात्र तुम्हाला कल्पनाही नसेल तुम्ही वापरत असलेला लाकडी चॉपिंग बोर्ड तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय.
अपोलो रूग्णालयातील वरिष्ठ क्लिनिकल आहारतज्ञ वर्षा गोरे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, लाकूड त्याच्या स्वभावानुसार सच्छिद्र (Porous) असते. म्हणजेच आपण त्यावर जे काही कापतो ते अन्नपदार्थातील ओलावा सहजपणे शोषून घेतं. ताज्या टोमॅटोचा रस असो, कच्च्या चिकनचे अवशेष असो किंवा आलं-लसूण असो. भारतासारख्या देशात, ज्या ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण जास्तीत जास्त वर्षभर टिकून असतं, अशा ठिकाणी ही आर्द्रता जीवाणू, बुरशी वाढण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार करते.
नियमित वापरामुळे लाकडी चॉपिंग बोर्डच्या पृष्ठभागावर लहान ओरखडे येतात. या लहान भेगा साफ करणं काहीसं कठीण असतं. ज्यामध्ये साल्मोनेला, ई. कोलाय असे हानीकारक बॅक्टेरिया निर्माण होतात. आपण जे अन्न तयार करतो त्यामाध्यमातून हे बॅक्टेरिया तुमच्या पोटात जाऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
याव्यतिरिक्त, लाकडी बोर्डचे कालांतराने लहान कण अन्नात मिसळू शकतात. या कणांचे सेवन करणं नुकसानदायक ठरू शकतं. यामुळे पचनमार्गात अडथळे येऊ शकतात. यामुळे आरोग्याचे कोणते धोके उद्भवतात ते पाहूयात
अयोग्यरित्या साफ न केलेल्या लाकडी चॉपिंग बोर्डमधून E. coli आणि साल्मोनेला सारख्या बॅक्टेरियामुळे फूड बॉर्न डिसीज होऊ शकतात. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनमुळे लोकांना ताप, जुलाब, उलट्या आणि डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या यांसारखे त्रास जाणवू शकतात.
दमट स्वयंपाकघरामध्ये लाकडी चॉपिंग बोर्डला बुरशी येऊ शकते. ही केवळ स्वच्छतेची समस्या नाही यामुळे मायकोटॉक्सिन श्वासोच्छवासाच्या समस्यांशी संबंधित हानिकारक कंपाऊंड्स निर्माण होऊ शकतात.
जुन्या लाकडी चॉपिंग बोर्डमधून लहान तुकडे पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात. यामध्ये क्वचित प्रसंगी आतड्याला दुखापत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.