Heart attack problem in Marathi, heart attack symptoms in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Heart Attack Symptoms : किशोरवयीन मुलांमध्ये वाढला हृदयविकाराचा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणे

Teen Heart Health : आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे किशोरवयीन मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे. सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेत उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.

Sakshi Sunil Jadhav

आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर किशोरवयीन मुलांमध्येही तो झपाट्याने वाढत आहे. अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, औषधांचे दुष्परिणाम आणि वाढता मानसिक ताण हे घटक लहान वयातील हृदयाचे आरोग्य धोक्यात आणत आहेत.

सागर हॉस्पिटलमधील नामांकित हार्ट सर्जन डॉ. बलबीर सिंग यांच्या मते, किशोरवयीन वयोगटात हृदयविकाराचा धोका तुलनेने कमी असल्याने सुरुवातीच्या लक्षणांकडे पालक आणि मुलं दोघेही दुर्लक्ष करतात. यामुळे उपचारांमध्ये उशीर होऊन परिस्थिती गंभीर स्वरूप धारण होऊ शकते. त्यामुळे जागरूकता आणि निरोगी सवयींचा अवलंब करणे हा धोका कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

किशोरवयीन मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे प्रौढांपेक्षा काहीशी वेगळी असू शकतात. छातीत दुखणे किंवा अस्वस्थता ही सर्वाधिक आढळणारी लक्षणे असून, छातीच्या मध्यभागी दाब, घट्टपणा किंवा जडपणा जाणवणे हे संकेत दुर्लक्ष करण्याजोगे नसतात. कधी कोणत्याही कारणाशिवाय श्वास लागणे, छातीतून वेदना डाव्या हात, पाठ, मान किंवा जबड्यापर्यंत पसरत जाणे, अत्यंत थकवा जाणवणे, अचानक चक्कर येणे, बेशुद्ध होणे किंवा उलट्या होणे आणि थंड घाम येणे ही लक्षणे देखील गंभीरतेने घ्यावीत.

अनेकदा ही लक्षणे स्नायू दुखणे, अपचन किंवा फ्लू समजून दुर्लक्षित केली जातात. परंतु अशा सुरुवातीच्या संकेतांकडे वेळेवर लक्ष देणे, तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आणि उपचार सुरू करणे यामुळे गंभीर हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाचे नुकसान टाळता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT