Tata Group iPhone Manufacturing News Saam Tv
लाईफस्टाईल

Tata Group iPhone Manufacturing News : iPhone मेड इन इंडिया! भारतातच फोनची निर्मिती, चीनला भिडणार टाटा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tata iPhone Manufacturing Plant In India : देशातील सर्वात मोठी औद्योगिक घराणी असलेल्या टाटा समूहाचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. लवकरच कंपनी आयफोन बनवण्याच्या व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. अॅपलच्या पुरवठादार विस्ट्रॉन कॉर्पशी त्यांची बोलणी सुरू असून ऑगस्टपर्यंत दोन्ही कंपन्यांमध्ये करार होऊ शकतो, असे मानले जात आहे. हा करार पुढे गेल्यास टाटा समूह आयफोन असेंबल करणारी पहिली भारतीय कंपनी असेल.

टाटा समूहाने भारतातील महत्त्वाकांक्षी उत्पादन केंद्रात Apple च्या आयफोनचे उत्पादन सुरू केले आहे. TOI च्या अहवालानुसार, टाटा (Tata) समूह भारतात आयफोनचे उत्पादन करण्यासाठी तैवानी कंपनी विस्ट्रॉनची बंगळुरू येथील नरसापुरा कारखाना ताब्यात घेण्याची योजना आखत आहे. गेल्या महिन्यात अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्यासोबत मुंबईत दीर्घ बैठक घेतली होती.

तैवानची कंपनी विस्ट्रॉन करारावर इलेक्ट्रॉनिक (Electronic) वस्तू तयार करते. विस्ट्रॉनने या आर्थिक वर्षात या कारखान्यातून किमान $1.8 अब्ज किमतीचे आयफोन तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे जेणेकरून त्याला सरकारी प्रोत्साहन मिळू शकेल. कंपनीने पुढील वर्षापर्यंत तिप्पट कर्मचारी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

विस्ट्रॉनला भारतातील आयफोन व्यवसायातून बाहेर पडायचे आहे आणि टाटाने ते खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. टाटा, विस्ट्रॉन आणि ऍपलच्या प्रवक्त्यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने अॅपलच्या कामकाजातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आता त्यांचे लक्ष इतर व्यवसायांवर असेल. कंपनी भारतात ऍपल व्यतिरिक्त इतर उत्पादनांमध्ये आपली क्षमता तपासणार आहे.

आयफोनचे असेंबल करणे खूपच आव्हानात्मक आहे

आयफोनचे असेंबलिंग हे अतिशय आव्हानात्मक काम मानले जाते, खरेतर अमेरिकेतील अनेक क्वॉलिटी मानके पूर्ण करावी लागतात. ती पूर्ण केल्यानंतरच कंपनीला तिच्या उत्पादनासाठी मान्यता दिली जाते. अॅपलने नवीन प्लांटद्वारे असेंबलिंग वाढवून आपल्या आयफोनचे (iPhone) उत्पादन 5 पटीने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

चीनला मोठा धक्का

सरकार कंपन्यांना उत्पादन आणि रोजगार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कोरोना महामारीमुळे पुरवठा समस्या आणि अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आहेत.

अशा स्थितीत भारत हा गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश म्हणून पुढे आला आहे. टाटा समूहाने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात प्रवेश केला आहे. तामिळनाडूतील कंपनीची फॅक्टरी आयफोनची चेसिस म्हणजेच डिव्हाइसचा मेटल बॅकबोन बनवते. यासोबतच कंपनीने चिप्स बनवण्यातही रस दाखवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT