Vrushabh Rashi 2024  Saam tv
लाईफस्टाईल

Vrushabh Rashi 2024 : वृषभ राशीला नवीन वर्षात येतील अच्छे दिन! आरोग्याची काळजी घ्या, राजयोगामुळे आर्थिक लाभ

Taurus Horoscope 2024 : चंद्र सिंह राशीत असेल तर गुरु मेष राशीत असल्यामुळे अनेक ग्रहांचे शुभ-अशुभ फले मिळतील. जाणून घेऊया कसे असेल वृषभ राशीसाठी नवीन वर्ष.

कोमल दामुद्रे

Vrushabh Rashibhavishya In Marathi 2024 :

नवीन वर्षाची चाहुल लागताच अनेकांना वर्षभरात आपल्या सोबत काय चांगले-वाईट होईल याचे वेध लागतात. ग्रहांच्या स्थितीनुसार अनेकांच्या जीवनात मोठे बदल दिसून येतात. नवीन वर्षात अनेक ग्रहांची स्थिती पाहिली तर सूर्य आणि मंगळ हे भौमादित्य योग तयार करुन धनु राशीत प्रवेश करतील.

वृश्चिक राशीत बुध आणि शुक्र योग कारक स्थितीत असतील. चंद्र सिंह राशीत असेल तर गुरु मेष राशीत असल्यामुळे अनेक ग्रहांचे शुभ-अशुभ फले मिळतील. जाणून घेऊया कसे असेल वृषभ राशीसाठी नवीन वर्ष. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोग्य (Health) आणि मानसिक दृष्टिकोनातून पाहिले तर वृषभ राशींच्या लोकांसाठी हे वर्ष सकारात्मक असेल. मनोबल चांगले राहिल. तब्येतही साधारणपणे ठीक राहिल पण काही वेळा पोटाच्या समस्या, मूळव्याध आणि गॅसेसचा सामना करावा लागेल. तोंडाचे व्रण, सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

पैसा (Money) आणि उत्पन्नासाठी हे वर्ष अधिक चांगले असेल. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होऊ शकते. अचानक आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक (Family) कार्यात वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे.

नोकरी, पद, प्रतिष्ठा, सन्मान आणि शौर्य या दृष्टिकोनातून २०२४ हे वर्ष वृषभ राशींसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. समाजिक वर्तुळात वाढ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढू शकते. नोकरीच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होतील. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कामानिमित्त लांबचा प्रवास होऊ शकतो.

जोडीदाराच्या आनंदात आणि सहवासात वाढ होईल. लग्न कार्यात अडचणी येऊ शकतात. जीवनसाथीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवासही घडतील. सकारात्मक राहाल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT