heart SAAM TV
लाईफस्टाईल

हृदयाचं आरोग्य जपा! 40-45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींनी 'या' टेस्ट करून घ्याच!

Heart check-up Tests: पुढील काळात होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी 40-45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना नियमित हृदय तपासणीचा सल्ला दिला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयाच्या समस्या हे जगभरातील मृत्यूचं सर्वात मोठं कारण मानलं जातं. जीवनशैलीतील बदल हा हृदयविकाराच्या प्रतिबंधास प्रमुख घटक ठरताना दिसतो. पुढील काळात होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी 40-45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना नियमित हृदय तपासणीचा सल्ला दिला जातो.

मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे म्हणाले की, एकदा जोखीम घटकांचं निदान झालं की तुम्ही हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचं आहे. वेळेवर ह्रदय तपासणी केल्याने एखाद्याला हृदयाच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती मिळते. जेणेकरून हृदय निरोगी राखण्यास मदत होते.

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या 2023 च्या अहवालानुसार, भारतातील एकूण मृत्यूंपैकी 30% मृत्यू हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे होत असल्याचं समोर आलं आहे. याचं प्राथमिक कारण इस्केमिक हृदयरोग आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरी जीवनशैलीतील घटक जसं की आहाराची चुकीची सवय, तणाव, मधुमेह, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, धूम्रपान यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते.

डॉ. भामरे यांनी पुढे सांगितलं की, हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल्युअर यासारख्या हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त लाखो रुग्ण आपल्या भारतात आहेत. अशामध्ये डॉक्टरांनी शिफारस केलेल्या चाचण्या करणं महत्त्वाचं आहे.

हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता या चाचण्या करा

  • हृदयाच्या रुग्णांसाठी आठवड्यातून 2-3 वेळा रक्तदाब निरीक्षण केलं गेलं पाहिजे.

  • उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्समुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. यासाठीच हृदयाच्या रुग्णांनी दर 6 महिन्यांनी लिपिड प्रोफाइल तपासणी करावी.

  • हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दर सहा महिन्यांनी कराव्यात या खालील तपासण्या

  • हृदयाच्या आरोग्याचं निरीक्षण करण्यासाठी स्ट्रेस टेस्ट चाचणी दरवर्षी केली पाहिजे.

  • दर 6 महिन्यांनी रक्तातील साखरेची पातळी तपासली गेली पाहिजे.

नियमित तपासणी केल्याने ह्रदयाच्या रूग्णांना आरोग्य व्यवस्थापन करण्यास मदत होते. हृदयाच्या समस्येशी लढा दिल्यानंतर उद्भवणारी कोणत्याही गुंतागुंत टाळता येऊ शकते. एक्टिव्ह जीवनशैली बाळगणं हे एखाद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते, असंही डॉ. भामरे यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT