Monsoon Train Travelling Tips Saam TV
लाईफस्टाईल

Monsoon Train Travelling Tips : पावसाळ्यात ट्रेन पकडताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा तुमच्या जीवावर सुद्धा बेतेल

Train Travelling Tips In Marathi : गर्दीत आणि पावसात ट्रेन पकडताना अनेक व्यक्ती खाली पडतात. त्यांना दुखापत होते, तर काहींचा यात जीव देखील जातो.

Ruchika Jadhav

दररोज लाखो चाकरमानी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास म्हणजे गर्दी, गोंधळ आणि भांडणं आलीच. त्यातूनही मुंबईकर दररोज आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचतात. त्यात सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसामुळे ट्रेन रोज उशिराने धावते. त्यामुळे फलाटावर मोठी गर्दी उफाळून येते.

अशा गर्दीत आणि पावसात ट्रेन पकडताना अनेक व्यक्ती खाली पडतात. त्यांना दुखापत होते, तर काहींचा यात जीव देखील जातो. त्यामुळे आज पावसाळ्यात ट्रेनने प्रवास करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? याबाबत जाणून घेऊ.

धावती ट्रेन पकडणे -

बसायला जागा मिळावी यासाठी प्रत्येक जण धावपळ करत ट्रेन पकडतात. त्यात काहीवेळा पावसाने ट्रेनचे हॅण्डल आणि दरवाजावर पाणी असतं. पाण्याने आपला हात सटकण्याची भीती असते. त्यामुळे ट्रेन पकडत असताना कायम धावती ट्रेन पकडताना काळजी घ्यावी.

बॅग समोर पकडणे -

गर्दी असल्याने जर तुमच्याकडे टू साईड बॅग असेल तर ती पुढे पोटाजवळ पकडा. जर बॅग वन साईड असेल तर ती देखील समोर घ्या. बॅग पाठीवर असल्यास गर्दीतून ट्रेनमध्ये चढताना आपण मागे खेचले जातो. त्यामुळे बॅग कायम पोटाजवळ ठेवा.

छत्री बॅगमध्ये ठेवणे -

मुंबईमधील सेंट्रल लाईनवरील अनेक स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी हवी तशी सोय नाही. अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवर पावसाचे पाणी पडते. त्यामुळे पाऊस आल्यावर अशावेळी काही जण छत्री घेऊन उभे राहता. ट्रेन आल्यावर ती पकडत असताना एका हातात छत्री तशीच ठेवतात. मात्र हातात छत्री असल्याने ट्रेन पकडताना अडचणी येतात. त्यामुळे जेव्हा अशी स्थिती असेल तेव्हा छत्री एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून बॅगमध्ये ठेवून द्या. जेणेकरून दोन्ही हात मोकळे राहतील आणि तुम्हाला सहज ट्रेन पकडता येईल.

पावसाळी बुटं वापरणे -

पावसाळ्यात कापडाचे बूट ओले होतात. त्यामुळे कायम पावसाळी बूट वापरावेत. ट्रेनचा प्रवास करताना पावसाळी सँडल किंवा चप्पल खरेदी करू नका. गर्दीमध्ये काहीवेळा पायावर नकळत पायावर पाय पडतो. त्यामुळे पावसाळ्यात कायम बूट वापरावेत.

एक जास्तीचा रुमाल बॅगमध्ये ठेवणे -

पाऊस असल्याने आपण ओले होते. तसेच ट्रेनमध्ये सुद्धा पाणी येते. काही वेळा सीट सुद्धा ओल्या होतात. त्यामुळे सीट असूनही आपल्याला बसता येत नाही. अशावेळी आपल्याकडे जास्तीचा एक रुमाल असणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण ते पाणी पुसून सीटवर बसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT