नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

nagpur news : नागपुरात निर्माणाधीन पाण्याच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेतील मृतांची नावे समोर आली आहेत.
Nagpur news
nagpur news Saam tv
Published On
Summary

नागपुरात दुपारी पाण्याच्या टाकीचा स्फोट

पाण्याच्या टाकीच्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू

काही कामगार जखमी

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरातील एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. निर्माणाधान टाकी कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्यााली दबले गेले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत ६ कामगारांचा मृत्यू झाला. यात काही कामगार देखील जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आवाडा कंपनीच्या निर्माणाधीन पाण्याच्या टाकीचा सकाळी ११ वाजता स्फोट झाल्याची घटना घडली. यात आतापर्यंत सहा जण दगावले. तर काही जण जखमी झाले.

टाकीचा स्फोट झाल्यानंतर तातडीने काही जण मदतीला धावले. त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले. त्यांनी ८ कामगारांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती पोलीसही घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचले.

Nagpur news
मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील ही आवाडा सोलर पॅनल तयारी करणारी कंपनी आहे. याच कंपनीमध्ये एक टाकी तयार करण्यात येत होती. या टाकीचे काम अंतिम टप्प्यात आले असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेचा व्हिडिओ आणि फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Nagpur news
डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

मृतकांची नावे

1. अरविंद कुमार ठाकुर ,वय. 28 वर्षे, रा. चंपारण ( बिहार )

2. अशोक कंचन पटेल, वय. 42 वर्षे, रा. पहाडपूर ( बिहार)

3. अजय राजेश्वर पासवान, वय. 26 वर्षे, रा. मूजफ्फरपूर (बिहार)

4. सुधांशु कुमार नागेश्वर साहणी, वय. 36 वर्षे, रा. मूजफ्फरपूर (बिहार),

5. बुलेट कुमार इंद्रजित षहा, वय. 30 वर्षे रा. मिश्रौली, सुहानी, पश्चिम चंपारण (बिहार)

6. शमिम अन्सारी, वय. 42 वर्षे, रा. मूजफ्फरपूर (बिहार)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com