मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Amberbath news : मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप शिंदे गटाने केलाय. शिंदे गटाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.
Amberbath news
Amberbath political news Saam tv
Published On
Summary

अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीपूर्वी EVM छेडछाडीचा आरोप शिंदे गटाने केला

शिंदे गटाच्या आरोपाने प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शिंदे गटाच्या आरोपांमुळे स्थानिक राजकारणात तणावाचे वातावरण

राज्यातील काही भागात शनिवारी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेसाठी शनिवारी मतदान होणार आहे. या मतदानसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू आहे. मतदानासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांची तयारी सुरु असताना अंबरनाथमधील शिंदे सेनेच्या नेत्यांनी गंभीर आरोप केला. शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथमध्ये EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी म्हणजे २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी शासकीय कर्मचारी सज्ज झाले आहेत. तर या मतदानाचा कार्यक्रमासाठी १५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असल्याची माहिती मिळत आहे. या मतदानाच्या आदल्यादिवशी शिंदे गटाने केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Amberbath news
Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

अंबरनाथ नगरपरिषदेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला. शिंदे गटाच्या आरोपाने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोपानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची सरकारी कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली.

Amberbath news
कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

अंबरनाथमध्ये कुठे घडला प्रकार?

पालिकेच्या निवडणुकीदरम्यान पॅनल क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याचा आरोप शिवसेनेने केला. अंबरनाथमधील साऊथ इंडियन शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आलाय.

शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर यांनी भाजप उमेदवाराचा भाऊ तुषार तेलंगे यांच्यावर ईव्हीएमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला. आरोपामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकारानंतर ईव्हीएम मशीन तातडीने बदलण्यात याव्यात,अशी मागणी गोपाळ लांडगे यांनी केली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाईची मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com