Monsoon Trekking Tips : पावसात ट्रेकिंगचा प्लान करताय? अशी घ्या स्वतःची काळजी

Trekking Tips : पावसाळ्यात ट्रेकिंग करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.
Trekking Tips
Monsoon Trekking TipsSAAM TV
Trekking in the rain
Trekking in the rainYandex

पावसात ट्रेकिंग

पावसात फिरण्याची आणि ट्रेकिंग करण्याची मज्जाच खूप वेगळी आहे. युवा मोठ्या संख्येने पावसात ट्रेकिंगचा आनंद घेतात.

Danger of trekking in rain
Danger of trekking in rainYandex

पावसात ट्रेकिंगचा धोका

मात्र पावसात ट्रेकिंग करताना आपण स्वतःची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण पावसात अनेक भागात पाणी साचते, जमिनी गुळगुळीत होते. त्यामुळे ट्रेक करताना धोका निर्माण होतो.

Do not go trekking alone
Do not go trekking aloneYandex

एकट्याने ट्रेकिंगला जाऊ नये

पावसाळ्यात कधीही एकट्याने ट्रेकिंगला जाऊ नये. नेहमी ग्रुपने जावे. कारण कधीही कोणताही वाईट प्रसंग येऊ शकतो. त्यामुळे आपल्या सोबत कोणी असल्यास तुम्ही सुखरूप वाचू शकता.

Trekking bag
Trekking bagYandex

ट्रेकिंग बॅग

ट्रेकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर चढाई केली जाते. त्यामुळे पाठीवर असलेल्या बॅगमध्ये कमीत कमी सामान ठेवावे. कारण पावसात डोंगर चढताना पाय घसरण्याची शक्यता जास्त असते.

Mobile network problem
Mobile network problemYandex

मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेम

ट्रेकिंग करताना आपण खूप उंचावर चढत जातो. त्यामुळे मोबाईलच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे नेटवर्क मिळता क्षणी आपले लाइव लोकेशन आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवून ठेवावे.

Trekking guide
Trekking guideYandex

ट्रेकिंग गाईड

जर खूप अनोळखी ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगसाठी जाणार असाल तर नेहमी आपल्यासोबत गाईड ठेवा. ज्याला त्या प्रदेशाची संपू्र्ण माहिती असेल.

Avoid trekking at night in rain
Avoid trekking at night in rainYandex

पावसात रात्री ट्रेक टाळा

पावसाळ्यात सहसा रात्री ट्रेक करणे टाळावे. कारण हिंस्र प्राण्यांचा धोका पावसात जास्त वाढतो.

How to dress while trekking?
How to dress while trekking?Yandex

ट्रेक करताना कपडे कसे घालावे?

पावसात ट्रेक करताना नेहमी फुल पँट आणि फुल शर्ट परिधान करावे. त्यामुळे हातापायाला कीटक, माशी, मुंग्या चावत नाही.

Use of whistle
Use of whistleYandex

शिट्टीचा वापर

पावसात ट्रेक करताना कधीही आपल्या जवळ शिट्टी ठेवावी. कारण वाट विसरल्यास किंवा काही समस्या निमार्ण झाल्यास तुम्ही त्या शिटीच्या साहाय्याने मदत मागू शकता.

Health care
Health careYandex

आरोग्याची काळजी

पावसात बदलत्या वातावरणामुळे आपली तब्येत सांभाळून ट्रेक करावे. उत्साहात ट्रेक प्लान करू नये. नेहमी आपली औषधे ट्रेकला सोबत ठेवावी.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com