स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

Civic Poll Tensions Rise: महापालिका निवडणुकीआधीच महायुतीत खटके उडायला सुरुवात झालीय... भाजपच्या स्थानिक नेत्यांनी थेट शिंदेसेनेला विरोध केलाय... मात्र महायुतीत संघर्षाची ठिणगी कुठे पडलीय आणि भाजपनं शिंदेसेनेची कशी कोंडी सुरु केलीय..
BJP and Shinde Sena leaders amid rising tensions ahead of Maharashtra municipal elections.
BJP and Shinde Sena leaders amid rising tensions ahead of Maharashtra municipal elections.Saam Tv
Published On

राज्यात महापालिका महायुतीतच लढणार, अशी भीमगर्जना भाजप नेत्यांनी केली...मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या ठाणे, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने शिंदेसेनेसोबतच्या युतीला कडाडून विरोध केलाय... ठाण्यात भाजपच्या 18 मंडळ अध्यक्षांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना पत्र लिहून स्वबळावर लढण्याची मागणी केलीय... या पदाधिकाऱ्यांची समजूत घालण्यासाठी भाजप नेत्यांची मात्र चांगलीच धावाधाव झाली...

खरं तर शिंदेसेनेसोबतच्या युतीला फक्त ठाण्यातच विरोध होतोय असं नाही... तर नवी मुंबईतही गणेश नाईकांचा मुलगा संजीव नाईक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची बैठक झालीय. या बैठकीत गटबाजी टाळण्यासाठी भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने शिंदेसेनेसमोर फिफ्टी- फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवत आरपारचा नारा दिलाय..त्यामुळे शिंदेसेनेची कोंडी झाल्याचं चित्र आहे...

खरं तर 2015 आणि 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचं संख्याबळ किती होतं...

ठाणे

ठाण्यात 131 पैकी 67 जागांवर शिवसेनेने बाजी मारली होती.. तर भाजपला फक्त 23 जागा जिंकता आल्या होत्या... मात्र सध्या 67 पैकी 60 माजी नगरसेवक शिंदेसेनेकडे तर भाजपकडे 25 माजी नगरसेवकांचं संख्याबळ आहे

नवी मुंबई

नवी मुंबईत 111 जागांपैकी तत्कालीन गणेश नाईकांच्या नेतृत्वात 52 तर शिवसेनेला 38 जागांवर विजय मिळाला होता... मात्र नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे सध्या भाजपकडे 55 तर शिंदेसेनेकडे 53 माजी नगरसेवकांचं संख्याबळ आहे.

छत्रपती संभाजीनगऱ

एकूण- 113

शिवसेना- 29

भाजप- 22

शिंदेसेना- 20 माजी नगरसेवक

भाजप- 25 माजी नगरसेवक

ठाणे आणि संभाजीनगरमध्ये आता भाजपनं 50-50 फॉर्म्युला ठेवलाय.. तर नवी मुंबईत एकला चलोची तयारी केलीय... त्यामुळे भाजप शिंदेंसेनेला बालेकिल्ल्यातच घेरत असल्याने ऐन महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता अधिक आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com