Mumbai Local Train : ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी; जूनपर्यंत प्रत्येक डब्ब्यात असणार टॉकबॅक अन् सीसीटीव्ही

Mumbai Local Train Women Coaches News : महिलांचा लोकल ट्रेनमधील प्रवास जूननंतर आणखी सुखकर होणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून टॉकबॅक आणि सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक महिला डब्ब्यात बसवले जाणार आहेत.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainSaam TV

दररोज मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांचा लोकल ट्रेनमधील प्रवास जूननंतर आणखी सुखकर होणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून टॉकबॅक आणि सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक महिलांच्या डब्ब्यात बसवले जाणार आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ होईल.

Mumbai Local Train
Mumbai Crime News: सोशल मीडियावरील मैत्री पडली महाग; तरुणाकडून घरी बोलावून अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य, परिसरात खळबळ

काही दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांच्या महासंचालक कार्यालयाने रेल्वेच्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये महिलांना प्रवासात जाणवणाऱ्या समस्या विचाराण्यात आल्या. यातील अनेक महिलांनी असं म्हटलं की, रात्री आणि पहाटे ६ पर्यंत प्रत्येक लेडीज डब्ब्यात एक सुरक्षारक्षक अथवा पोलीस तैनात असतात. या सुवेधेत आणखी भर टाकावा.

पोलिसांसह प्रत्येक महिला डब्ब्यात एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि एक टॉकबॅक बसवण्यात यावा, अशी मागणी ५९ टक्के महिलांनी केली होती. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि टॉकबॅक बसवण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेतील लोकल ट्रेनमध्ये असलेल्या ७७१ डब्ब्यांपैकी ६०६ डब्ब्यांमध्ये सीसीटीव्ही कमेरे आधीच बसवण्यात आलेले आहेत.

यातील उर्वरीत डब्ब्यांमध्ये मेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टॉकबॅकमध्ये महिलांना कोणतीही समस्या जानवल्यास थेट गार्डशी संपर्क साधता येणार आहे.

गेल्या काही दिवसांत महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना मोठ्याप्रमाणावर वाढल्यात. महिलांच्या डब्ब्यामध्ये शिरुन त्यांच्यावर हल्ले झाल्याच्या दोन घटना काही महिन्यांपूर्वीच घडल्यात. यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलांच्या डब्ब्यात शिरून त्यांच्यावर अत्याचार आणि हल्ला करण्याच्या धक्कादायक घटनांनी मुंबई हादरली आहे. तेव्हापासून लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याचे प्लानींग सुरू आहे.

Mumbai Local Train
Hingoli Crime : खळबळजनक! व्हिडिओ रेकॉर्ड करत विवाहित महिलेने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com