Fatty liver symptoms at night saam tv
लाईफस्टाईल

Fatty liver: रात्रीच्या वेळेस दिसतात फॅटी लिव्हरची लक्षणं; शरीरात 'हे' बदल होत असतील तर सावध व्हा

Fatty liver symptoms at night: फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे. ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाही. त्यामुळे याला 'सायलेंट किलर' असेही म्हटले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

  • फॅटी लिव्हर हा यकृतात चरबी साचण्यामुळे होणारा आजार

  • या आजाराचे दोन टप्पे असतात, ज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात यकृताला सूज येते आणि ते निकामी होऊ शकतं

  • रात्री विशेषतः झोप न लागणं, पोटात अस्वस्थता, थकवा आणि भूक मंदावणे ही लक्षणं दिसतात

आजकाल जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागले आहेत. यामधील एक म्हणजे फॅटी लिव्हरचा त्रास. फॅटी लिव्हर म्हणजे आपल्या यकृतामध्ये चरबी साचत जाते. विशेष म्हणजे यामध्ये काही प्रमाणात हा आजार मद्यपानामुळे होत नाही. याला 'नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज' (NAFLD) असं म्हणतात. हा आजार मुख्यतः स्थूलपणा, मधुमेह आणि चुकीच्या जीवनशैलीशी संबंधित असतो.

यामध्ये दोन टप्पे असतात. यामध्ये सुरुवातीला चरबी साचते पण लिव्हरला सूज नसते. मात्र पुढे सूज आणि लिव्हरच्या पेशींवर दुष्परिणाम होतो. जर या समस्येकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर दिल्यास हा आजार सिरोसिस किंवा यकृत निकामी होण्यासारख्या गंभीर स्थितीत पोहोचतो. या समस्येची काही गंभीर लक्षणं खास रात्रीच्या वेळी दिसून येतात. ही लक्षणं कोणती आहेत ते जाणून घेऊया.

रात्री दिसणारी लक्षणं

झोप न लागणं

फॅटी लिव्हर असणाऱ्या अनेकांना रात्री झोप न लागण्याची समस्या भेडसावते. याचं कारण लिव्हरमध्ये असणारी सूज, शरीरात जमा होणारे विषारी घटक आणि रक्तातील साखरेत असंतुलन निर्माण होतं. परिणामी तुम्हाला रात्री झोप लागत नाही.

रात्री भूक न लागणं

NAFLD असलेल्या रुग्णांमध्ये रात्रीच्या वेळेस भूक कमी लागते. शरीरातील चयापचय प्रक्रियेवर परिणाम झाल्यामुळे अन्न पचवण्याची ताकद कमी होते. त्यामुळे जेवणाची इच्छा राहत नाही. काही वेळेस ही लक्षणं हळूहळू वाढत जातात आणि त्याकडे लक्ष दिलं जात नाही.

मेंदूवर परिणाम होणं

फॅटी लिव्हरमुळे शरीरात साचणारे विषारी घटक थेट मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. यामुळे स्मरणशक्ती मंदावते लक्ष एकाग्र करता येत नाही आणि विचार करण्याची प्रक्रिया मंद होते. याला 'ब्रेन फॉग' असं म्हटलं जातं.

सतत थकवा जाणवणं

फॅटी लिव्हरमुळे शरीराच्या उर्जेवरही परिणाम होतो. एखादी व्यक्ती कोणताही शारीरिक परिश्रम न करता देखील थकून जाते. विशेषतः सकाळी उठताना किंवा रात्री झोपताना हा थकवा अधिक जाणवतो.

पायांमध्ये सूज येणं

लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्यावर शरीरात पाणी साचण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे पाय, टाचांमध्ये किंवा घोट्यांमध्ये सूज येते. ही सूज रात्री विशेषतः जाणवते कारण दिवसभर जमलेलं पाणी शरीराच्या खालच्या भागात साचलेलं असतं.

अंगाला खाज येणं

लिव्हरमधून पित्ताची योग्य निर्मिती आणि विल्हेवाट न लागल्यास त्वचेखाली पित्त जमा होतं. त्यामुळे अंगाला सतत खाज येते. ही खाज कोणत्याही पुरळ किंवा त्वचा विकाराशिवाय होते. ही खाज झोपताना अधिक त्रासदायक ठरते आणि झोपेचा व्यत्यय आणते.

वजन कमी होणं

फॅटी लिव्हरच्या गंभीर अवस्थेत शरीराचं वजन हळूहळू कमी होतं. विशेष म्हणजे हे वजन कमी होणं कोणत्याही प्रयत्नांशिवाय घडतं. ही बाब खूप वेळ दुर्लक्षित राहते. जेव्हा रुग्ण थकवा, भूक न लागणे आणि वजन कमी होणं या गोष्टी अनुभवतो तेव्हा तो डॉक्टरांची मदत घेतो.

फॅटी लिव्हर नक्की कशामुळे होतो?

स्थूलपणा, मधुमेह, आणि चुकीची जीवनशैली हे मुख्य कारणं आहेत.

फॅटी लिव्हरमध्ये कोणती लक्षणं रात्री दिसतात?

झोप न लागणं, उजव्या बाजूला पोटात अस्वस्थता, थकवा, खाज आणि सूज ही लक्षणं रात्री जाणवतात.

ब्रेन फॉग म्हणजे काय आणि याचा फॅटी लिव्हरशी काय संबंध आहे?

मेंदूवर विषारी घटकांचा परिणाम होऊन स्मरणशक्ती मंदावते. याला ब्रेन फॉग म्हणतात, आणि तो फॅटी लिव्हरमुळे होतो.

वजन कमी होणं फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं का?

होय, विशेषतः गंभीर अवस्थेत वजन कमी होणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे.

फॅटी लिव्हरची तपासणी किंवा निदान कसं केलं जातं?

डॉक्टर लिव्हर फंक्शन टेस्ट, अल्ट्रासाऊंड आणि काही वेळा बायोप्सीच्या माध्यमातून तपासणी करतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT