Early diabetes symptoms: मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीला शरीरात दिसतात 'हे' बदल; टेस्ट न करताही समजतील लक्षणं

Symptoms of high blood sugar: अनेकदा मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे इतकी सौम्य असतात की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना सामान्य समस्या समजतात. मात्र, या लक्षणांना वेळीच ओळखून योग्य वैद्यकीय सल्ला घेतल्यास मधुमेहाचे गंभीर दुष्परिणाम टाळता येतात.
Early diabetes symptoms
Early diabetes symptomssaam tv
Published On
Summary
  • मधुमेह हा पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे.

  • ब्लड शुगर कमी-जास्त झाल्यास शरीरात गंभीर त्रास होऊ शकतो.

  • दृष्टिदोष, वारंवार लघवी होणं, सतत थकवा वाटणं ही मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं आहेत.

मधुमेह, म्हणजेच डायबिटीज हा एक असा आजार आहे की एकदा झाला की त्यावर कोणताही उपचार नाही. यावर पूर्णपणे इलाज नाही पण नियंत्रण ठेवणं शक्य आहे. शरीरात साखरेचं प्रमाण म्हणजेच ब्लड शुगर खूप जास्त किंवा खूप कमी झालं तर अनेक अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

मात्र आपल्याला कोणताही गंभीर त्रास होण्यापूर्वी शरीर आपल्याला त्याचे संकेत देत असतं. मुळात ही लक्षणं जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. मधुमेहाची अशी काही लक्षणं आहेत जी तुम्हाला टेस्ट न करताही समजू शकतात.

नजर कमजोर होणं

जर तुम्हाला हल्ली अचानक कमी दिसत असेल, धूसर दिसणं किंवा एकदम चष्म्याचा नंबर बदलल्यासारखं वाटत असेल, तर हे डायबिटीजचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की डोळ्यांच्या आतल्या लेन्समध्ये सूज येते. त्यामुळे दृष्टि स्पष्ट राहात नाही.

Early diabetes symptoms
Signs of brain tumor: मेंदूमध्ये तयार होत असलेल्या गाठीला कसं ओळखाल? शरीरात दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नका

झोप घेतल्यानंतर थकवा जाणवणं

तुम्ही रात्री भरपूर झोप घेतली तरी दिवसभर थकवा जाणवतोय का? सतत अशक्तपणा वाटतोय का? तर हे देखील डायबिटीजचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. शरीरात ग्लूकोज (साखर) योग्य प्रकारे पेशींमध्ये पोहोचत नाही आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे काम करतानाअशक्तपणा जाणवू शकतो.

वारंवार लघवी होणं

शरीरात साखरेचं प्रमाण जास्त झालं की किडनी ती साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्हाला वारंवार लघवी लागते, विशेषतः रात्री झोपेतून उठून बाथरूमला जावं लागतं. काही वेळा पाणी जास्त प्यायल्यामुळे असं होतं, पण जर तुम्ही पाणी फारसं न पिता देखील वारंवार लघवी लागतेय, तर हे निश्चितच तपासून पाहण्यासारखं आहे.

खूप तहान लागणं

जर तुम्हाला सारखी तहान लागत असेल पाणी प्यायल्यावरही तहान भागत नसेल तर हे डायबेटीजचं लक्षण असतं. कारण जेव्हा वारंवार लघवी होते तेव्हा शरीरातून बऱ्याच प्रमाणात पाणीही बाहेर पडतं. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ लागतं.

Early diabetes symptoms
Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

खाल्ल्यावर लगेच भूक लागणं

जर तुम्ही नीट जेवल्यानंतरही लगेच पुन्हा भूक लागत असेल तर हे देखील डायबिटीजचं लक्षण आहे. यामागे कारण असं आहे की, शरीरात ग्लूकोज असूनही ते पेशींमध्ये नीट पोहोचत नाही, त्यामुळे पेशींना ऊर्जा मिळत नाही.

Early diabetes symptoms
Kidney fungal infection symptoms: तुमच्या किडनीलाही होऊ शकतं फंगल इन्फेक्शन; शरीरात होणारे 'हे' बदल वेळीच ओळखा
Q

मधुमेहावर कायमचा इलाज शक्य आहे का?

A

नाही, पण तो नियंत्रणात ठेवणं शक्य आहे.

Q

अचानक धूसर दिसणं हे कोणत्या आजाराचं लक्षण असू शकतं?

A

मधुमेहाचं, रक्तातील साखरेमुळे डोळ्यांच्या लेन्समध्ये सूज येते.

Q

मधुमेहामुळे वारंवार लघवी का लागते?

A

शरीरात वाढलेली साखर किडनीद्वारे लघवीतून बाहेर टाकली जाते.

Q

जेवल्यावर लगेच भूक लागणं हे मधुमेहाशी कसं संबंधित आहे?

A

ग्लूकोज असूनही पेशींना ऊर्जा न मिळाल्याने पुन्हा भूक लागते.

Q

झोपूनही थकवा जाणवतो, याचं कारण काय असू शकतं?

A

शरीराला पुरेशी ऊर्जा न मिळाल्यामुळे अशक्तपणा वाटतो, हे मधुमेहाचं लक्षण असू शकतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com