Cervical Pain
Cervical Pain Saam Tv
लाईफस्टाईल

Cervical Pain : शरीराच्या 'या' भागांवर तीव्र वेदना होताय ? असू शकते सर्वाइकलची शक्यता!

कोमल दामुद्रे

Health Tips : अनियमित जीवनशैली आणि खराब खानपान यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात.यातील एक म्हणजे सर्वाइकलच्या समस्या. हा त्रास जास्त वेळ खराब स्थित बसणे,लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम,फोनचा वापर तासंनतास करणे यामुळे होत आहे.

प्रत्येक दुसरी किंवा तिसरी व्यक्ती पाठदुखी, मानदुखी, मान ताठ होण्याच्या समस्येने त्रस्त आहे.ही समस्या लहान मुलांमध्येही (Kids) ही दिसून येत आहे. कधी कधी मान, पाठ आणि डोक्यात होणाऱ्या तीव्र वेदनाकडे (Pain) आपण दुर्लक्ष करतो, पण त्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्या भावी आयुष्यासाठी वाईट ठरू शकते.

बऱ्याच लोकांना हे देखील माहित नसते की त्यांना होणाऱ्या वेदना सर्वाइकलमुळे होत आहे.चला जाणून घेऊया सर्वाइकलच्या वेदना कुठे कुठे होऊ शकतात.

1. सर्वाइकलच्या वेदना का होतात?

झोपताना चुकीच्या स्थित झोपल्याने सर्वाइकलच्या वेदना होतात तसेच डोक्यावर जास्ती वजन उचल्याने या वेदना होतात,जास्ती वेळ मान झुकून राहिल्याने,एकच स्थित बराच वेळ असल्याने, झोपताना जाड आणि मोठ्या उशीचा वापर केल्याने आणि जड हेल्मेटचा वापर केल्याने सर्वाइकलच्या वेदना होतात.

2. यापासून बचाव कसा करायचा

  • खूप वेळ एकाच स्थित बसून काम करणे टाळा. मध्ये थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी उठा त्यामुळे तुम्ही सर्वाइकलच्या त्रासा पासून दूर रहाल.

  • तासनतास चुकीच्या आसंनात बसून फोन (Phone) वापरू नका.

  • मसाज करून तुम्ही सर्वाइकलच्या होणाऱ्या वेदनापासून आराम मिळवू शकता.

  • पोटावर झोपणे टाळा,यामुळे मान ताणली जाते आणि त्यावर प्रेशर येते.त्यामुळे अशा वेळेस पाठीवर किंवा एका बाजूला झोप ज्याने तुमचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

3. सर्वाइकलच्या वेदना कुठे होऊ शकतात ?

  • सर्वाइकलचे दुखणे मानेपासून सुरू होऊन पाठीमागे पोहोचू शकते असे अनेक डॉक्टरांचे मत आहे, याशिवाय शरीराच्या इतर भागातही वेदना होण्याची शक्यता आहे.

  • मानेमध्ये तीव्र वेदना आणि ताठरपणाची समस्या हे सर्वाइकलचे पहिले लक्षण मानले जाते. यामुळेच तुमची मान ताठ होते आणि तुमची मान फिरवता खूप वेदना होतात.

  • जर तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर तुम्हाला हे समजले पाहिजे की हे सर्वाइकलमुळे होत आहे.

  • हातांच्या स्नायूंमध्ये वेदना होणे आणि सर्वाइकलच्या वेदनामुळे हाताची बोटे यावरही परिणाम होतो. बोटांमध्ये कडकपणा आणि तीव्र वेदना जाणवतात.खांद्यामध्ये तीव्र वेदना आणि कडकपणा देखील सर्वाइकलमुळे होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

SCROLL FOR NEXT