Sweet Potato Shira  Saam TV
लाईफस्टाईल

Sweet Potato Shira : मऊ लुसलुशीत रताळ्याचा शिरा; वाचा सिंपल अन् सोपी रेसिपी

Ruchika Jadhav

सध्या अनेक व्यक्तींचे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत. अगदी नऊ दिवस उपवास असला की काय खावे आणि काय नाही हे समजत नाही. उपवासाला रोजची साबुदाणा खिचडी खाणे आता अनेकांना नकोसे वाटते. खिचडी खाण्यापेक्षा उपवासाचं काही तरी वेगळं खाण्यासाठी मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपवासाचा शिरा कसा बनवायचा याची माहिती सांगणार आहोत.

साहित्य

रताळे - २ ते ३

दुधाची मलई - ३ कप

पिठी साखर - २ वाटी

तूप - १ वाटी

ड्रायफ्रूट्स - १ वाटी

कृती

सर्वात आधी रताळे कुकरला शिजवून घ्या. किंवा मग पाण्याच्या वाफेवर वाफवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून टाका. साल काढल्यानंतर पुढे स्मॅशरचा उपयोग करून रताळे मस्त बारीक स्मॅश करून घ्या. रताळे स्मॅश झाले की, पुढे ते एका वाटीत काढून बाजूला ठेवून द्या.

आता एक पॅन घ्या. पॅन गॅसवर ठेवून ते थोडं तापवून घ्या. त्यानंतर यात तूप टाका. तूप थोडं गरम होईपर्यंत ड्रायफ्रूट्स मस्त बारीक करून घ्या. ड्रायफ्रूट्स बारीक झाले की पुढे सर्व ड्रायफ्रूट्स तुपात मस्त तळून घ्या. तुपात तळल्याने ड्रायफ्रूट्सला आणखी छान चव येते. त्यानंतर तयार रताळे तुपात टाकून ते भाजून घ्या.

तुपात रताळ्याचं मिश्रण छान भाजलं की, पुढे यात दुधावर असलेली मलई मिक्स करा. तुमच्याकडे दुधावरील मलई नसेल तर तुम्ही दूध आणि मिल्क पावडर सुद्धा यात मिक्स करू शकता. तसेच रताळे गोड असल्याने यात साखर मिक्स करण्याची गरज नाही. मात्र तुम्हाला जास्त गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही जास्तीची साखर मिक्स करू शकता.

सर्व मिश्रण आणि ड्रायफ्रूट्स सुद्धा एकत्र मिक्स केले की त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. अशा पद्धतीने तयार होईल तुमचा चविष्ट रताळ्याचा शिरा. हा शिरा तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: कच्चे-हिरवे टोमॅटो खाण्याचे ''हे'' आहेत भन्नाट फायदे

Sangli Crime: शौचालयात नेऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, सांगलीतील खळबळजनक घटना

Buldhana Tourism : खळखळून वाहणाऱ्या नद्या अन् सुंदर मंदिरांनी बहरलेला बुलढाणा

Rahul Gandhi News: 'हरियाणाचा निकाल अनपेक्षित...', अखेर राहुल गांधी बोलले; काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगितलं

Pune Crime: पुण्यात काय चाललंय? ३२ वर्षीय महिलेचे अपहरण, जंगलात नेऊन अत्याचार

SCROLL FOR NEXT