मुलांच्या खाण्याच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालाय. ज्यामुळे शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसह उर्वरित दिवसांमध्ये ते काय खातात यावर लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्यदायी, पौष्टिक आणि घरामध्ये शिजवल्या जाणाऱ्या आहारांच्या तुलनेत आज फास्टफूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेयं यांच्याकडे मुलांचा कल अधिक असतो. त्याचप्रमाणे आहाराची वेळ अनियमित आहे. या लहान, दैनंदिन निवडींमुळे बालपणी लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतोय.
मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या डेप्युटी मॅनेजर डॉ. दिव्या आचरेकर यांनी सांगितलं की, व्यक्तींच्या आधुनिक जीवनशैलीमधील मोठ्या बदलामुळे खाण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. दीर्घकाळापर्यंत स्क्रिन्स पाहत राहिल्यामुळे आळशीपणा वाढला आहे. यामुळे मुलांचं बाहेर खेळण्याचं प्रमाण कमी झालंय. मुलांना सर्वकाही सहजपणे उपलब्ध होतंय. त्यामुळे मुलं कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास टाळाटाळ करतायत
अयोग्य वेळी स्नॅक खाणं, नेहमी उच्च साखर आणि उच्च कॅलरी असलेले खाद्यपदार्थ किंवा जंक फूड्सचं सेवन करणं अशा सवयी सामान्य झाल्या आहेत. काळासह अशा सवयींमुळे नैसर्गिकपणे भूक लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. परिणामत: वजन वाढू शकतं आणि मुलांच्या चयापचय क्रियेवर परिणाम होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास या सवयींमुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढतोय यामुळे मुलांना टाइप २ मधुमेह लवकर होतो, असं डॉ. दिव्या यांनी सांगितंय.
आधुनिक काळातील खाण्याच्या सवयी समस्या वाढवण्यासाठी कारणीभूत आहेत. आज मुलं ब्रेकफास्ट टाळतात आहेत किंवा चालता-फिरता खाद्यपदार्थ खाताना दिसतात. ते विशेषत: शाळेतील मधली सुट्टी आणि वाढदिवस पार्टीदरम्यान पॅक केलेल्या स्नॅक्सचं अधिक प्रमाणात सेवन करत आहेत. शहरी भागामधील मुले अधिक वेळ स्क्रिन पाहण्यासोबत रात्री उशिरा हाय कॅलरी, साखरयुक्त खद्यपदार्थांचं सेवन करतात. या सवयींमुळै नैसर्गिकपणे भूक लागत नाही. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं आणि काळासह इन्सुलिन रोधक वाढत टाइप २ मधुमेह होऊ शकतो.
संशोधन व वैद्यकीय निरीक्षणांमधून समोर आलंय की, शहरी भागामधील जवळपास १४ टक्के मुलांचं वजन जास्त आहे किंवा ते लठ्ठ आहेत. ८ ते १० वर्ष वयोगटातील मुलांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका झपाट्याने वाढतोय. बहुतेक महानगरांमध्ये गेल्या दशकभरात ही आकडेवारी दुप्पट झाली असल्यामुळे मुलांच्या एकूण जीवनाला दीर्घकळापर्यंत गंभीर धोका होऊ शकतो.
फक्त शहरी भागात नाही तर अर्ध शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये देखील हे बदल दिसून येतात. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि सुलभतेमुळे पालकांचा आणि मुलांचा वेळ वाचतो. पण त्याचा काळासह आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लवकर लठ्ठपणा व टाइप २ मधुमेह झाल्याने जीवनाच्या उत्तरार्धात उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि हृदयसंबंधित आजार अशा गुंतागूंतींचा त्रास होऊ शकतो.
शहरी जीवनशैली सवयी जसं की, स्क्रिनवर अधिक वेळ घालवणं, जेवताना मोबाइलचा वापर करणं, अनियमित झोप आणि तणाव यांचा मुलांची भूक आणि चयापचय क्रियेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. एक किंवा दोन्ही वेळी आहार टाळणं, जेवताना खाद्यपदार्थाकडे लक्ष न देणं आणि उशिरा रात्री स्नॅकचं सेवन करणं या देखील वाढत्या समस्या आणि ट्रेण्ड्स आहेत. जे तरूण मुलांमध्ये दिसण्यात येतात. यामुळे मुलांना लहान वयापासून वाईट सवय लागते जी नंतरच्या जीवनात दूर करणं अत्यंत कठणी होऊन जातं.
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, दुग्धजन्य पदार्थ व लीन प्रोटीन्ससह संतुलित आहार तयार करा.
आहार सेवन करण्याची निश्चित वेळ ठऱवा.
मुलांना अधिक प्रमाणात स्नॅक्स खायला देणं टाळा.
साखरयुक्त आणि गोड पेयांऐवजी दूध, स्मूदीज किंवा ताजे फ्रूट ज्यूस द्या.
मुलांना दररोज किमान एक तास खेळ किंवा मैदानी खेळ खेळण्यास प्रेरित करा.
मुलांना आरोग्यदायी खाद्यपदार्थ खाण्याची सवय लावण्याकरिता एकत्र जेवा.
शाळा आणि पालक आरोग्यदायी आहाराचे सेवन, प्रमाणावर नियंत्रण आणि अर्थपूर्ण फूड निवडीबाबत जागरूकता निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
आरोग्यदायी आहारासोबत शारीरिक व्यायाम देखील महत्त्वाचा आहे. मुलांना कुटुंबासोबत चालायला जाणं, सायकल चालवत शाळेमध्ये जाणं, योगा करणं व एक्टिव्हपणे काम करणं अशा गोष्टी करण्यास प्रेरित करा. दिवसभरात लहान प्रमाणात व्यायाम, तसेच आरोग्यदायी आहाराचे सेवन चयापचय संतुलन राखण्यास मदत करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.