एप्रिल महिन्यात फाल्गुन अमावास्येला वर्षातले पहिले सूर्यग्रहण असणार आहे. यंदा हे सूर्यग्रहण ८ एप्रिल २०२४ ला असणार आहे. या दिवशी सोमवती अमावास्या देखील असणार आहे. खग्रास सूर्यग्रहण असून भारतात दिसणार नाही.
धार्मिक शास्त्रांमध्ये सूर्यग्रहण हे शुभ मानले जात नाही. या काळात राहूचा प्रभाव अधिक पडतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. हे ग्रहण भारतात दिसणार नसून त्याचे १२ राशींवर चांगला वाईट-परिणाम होईल. सूर्यग्रहणामुळे (Surya Grahan) काही राशींवर त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळेल. या राशींच्या लोकांनी सूर्यग्रहणाच्या काळात सावध राहायला हवे.
1. मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणाचा प्रभाव मध्यम असणार आहे. या काळात पैशांच्या व्यवहारापासून ते वाहन चालवण्यापर्यंत अनेक बाबतीत सावध राहायला हवे. पैसे जपून खर्च करा. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. जोडीदारासोबत (Partner) गैरसमज वाढू शकतात. आरोग्यावर (Health) परिणाम होईल.
2. कर्क
सोमवती अमावास्या असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते निराशा येईल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने काम कराल. विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल.
3. वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी सूर्यग्रहणाचा प्रभाव चढ-उतार असेल. वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतो. कामात व्यस्त राहाल. आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल.
4. कुंभ
आरोग्याची काळजी घ्या. कामाचा ताण वाढेल, जास्त घाई-गडबड करु नका. पैशांचे व्यवहार आणि गुंतवणूक करणे टाळा. पैसे अडकू शकतात. कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार कराल.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.