Surya Grahan 2024, Surya Grahan 2024 Date in India  saam tv
लाईफस्टाईल

Surya Grahan 2024 : ५ तास १० मिनिटांचे असणार वर्षातले पहिले सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? वाचा एका क्लिकवर

Surya Grahan 2024 Date in India : आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिलला दिसणार आहे. हे सूर्यग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या ५४ वर्षात पहिल्यांदाच असे सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

कोमल दामुद्रे

Solar eclipse 2024 :

आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिलला दिसणार आहे. हे सूर्यग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या ५४ वर्षात पहिल्यांदाच असे सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो तेव्हा त्याचा सूर्यप्रकाश थेट पृथ्वीवर पडण्याऐवजी चंद्रावर पडतो. अशा स्थितीत चंद्राची सावली पृथ्वीवर काही काळ सूर्यप्रकाश रोखून ठेवते. या घटनेलाच सूर्यग्रहण म्हणतात.

हे सूर्यग्रहण (Surya Grahan) चैत्र नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आले आहे. या सूर्यग्रहणाचा प्रभाव मीन रास आणि रेवती नक्षत्रावर होईल असे ज्योतिष्यांनी सांगितले आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

1. सूर्यग्रहण वेळ

वर्षातले पहिले सूर्यग्रहण हे ८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ९.१२ मिनिटे ते मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहणार आहे.

2. सूर्यग्रहण कुठे दिसणार?

वर्षातले पहिले सूर्यग्रहण भारतात (India) दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका , कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, इंग्लंड आणि आणि आयर्लंडच्या उत्तर-पश्चिम भागात दिसणार आहे.

3. सूर्यग्रहणाच्या वेळी या चुका करु नका

  • सूर्यग्रहणात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.

  • या काळात कोणतेही अन्नपदार्थ शिजवू नये तसेच सेवनही करु नये.

  • सूर्यग्रहणात तुळशीचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करुन घरात सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

  • या काळात मंदिरातही जाऊ नये असे म्हटले जाते.

  • सूर्यग्रहणात सुरी, चाकू सारख्या धारदार वस्तूंना स्पर्श करु नये, तसेच नखे कापू नका, दाढीही करु नका.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadh Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

SCROLL FOR NEXT